मुंबई

पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी हजर राहा, प्रताप सरनाईकांना ईडीकडून समन्स

पूजा विचारे

मुंबईः  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना क्वारंटाईन संपल्यानंतर चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. ईडीनं प्रताप सरनाईक यांना यासंदर्भात समन्स बजावलेत. मुंबईच्या बाहेरुन आल्यानं सरनाईक सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती करण्यात आली होती. त्यामुळे आता येत्या पुढच्या आठवड्यात प्रताप सरनाईक यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. तर प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक याची आज पुन्हा चौकशी होणार आहे. 

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीकडून सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक यांची देखील चौकशी करण्यात आली होती.  सोमवारी विहंग यांची 6 तास चौकशी केली होती. सरनाईक कुटुंबीय मुंबईलाच असल्याची माहिती असल्यामुळे ईडीने चौकशीला बोलावले आहे. आता अमित चांदोळे यांच्या अटकेनंतर आता प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला अटक

मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना अटक केली आहे.  जवळपास दोन दिवस १२ तास चौकशी केल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे.  चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे.   मंगळवारी त्यांची ईडीकडून करण्यात आली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडीनं चांदोळे यांना ताब्यात घेतलं.

अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. चांदोळे टॉप्स ग्रुपचे भागीदार असल्याची माहिती आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक केली आहे. टॉप्स सिक्युरिटी या ग्रुपविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. 

प्रताप सरनाईक यांचे जुने निवासस्थान आणि समता नगरमधील मुख्य जनसंपर्क कार्यालय ज्या इमारतीत आहे त्याच इमारतीत छाबियास विहंग सोसायटीत अमित चांदोळे राहतात. चांदोळे हे  प्रताप सरनाईक यांचे बालपणीचे मित्र आहेत.

Shiv Sena MLA Pratap Saranaik ED issued summons appear after quarantine period

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Biogas Project : बायोगॅस प्रकल्पासाठी १७० कोटींचा वाढीव खर्च? - ठेकेदाराला दर कमी करण्यासाठी दिले पत्र

Blinkit-Zepto वरून सामान मागवलं... पण मॅन्युफॅक्चरिंग डेटच गायब! आता काय करायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला उपाय

Supreme Court: ''आता ही शेवटची संधी..'' पॅकिंग फूडवरील इशाऱ्याबाबत सर्वोच्च न्यायालय आक्रमक, सरकारसह FSSAI ला अल्टिमेटम

Snake in Railway : पुणे-दानापूर एक्सप्रेस मध्ये साप; प्रवाशांमध्ये घबराट

Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

SCROLL FOR NEXT