मुंबई

लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून शिवसेना कोंडीत? महाविकास आघाडीवर भाजपची टीका

तुषार सोनवणे

मुंबई - भाजपशासीत राज्यांमधील उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात लव्ह जिहादविरोधी कायदा आणण्यात येणार आहे.. महाराष्ट्रातही असा कायदा आणवा यासाठी भाजप आग्रही आहे. यावरून भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी भाजपच्या लव्ह जिहादच्या भूमिकेवर सडकून टीका केली. भाजपने गाई वाचवण्याचा कायदा केला परंतु त्यांच्याच गोशाळेत गाई भूकेल्या पोटी मरत आहेत.देशात बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य इत्यादी अनेक समस्या आहेत. त्याकडे दूर्लक्ष करण्याचा भाजपचा डाव आहे. लव्ह जिहादचे कायदे आणण्यापेक्षा महिलांना नोकरी, सुरक्षितता आणि सन्मानाने जगता यावे यासाठी कायदे करणं गरजेचं असल्याचे अस्लम शेख म्हणाले.

कॉंग्रेस नेत्यांनी ही भूमिका घेतल्यानंतर शांत बसतील ते भाजपनेते कसले? आमदार राम कदमांंनी या मुद्यावरून शिवसेनेला खडे सवाल केले. हिंदू भगिनींवर लव्ह जिहादच्या नावाखाली सुरू असलेला अन्यायाचे शिवसेना समर्थन करते का? बाळासाहेबांच्या लव्ह जिहादबद्दलच्या भूमिकेला आणि विचारांना विसरले का?   असे ते म्हटले. 

हरियाणातील निकिता तोमर हत्याकांडानंतर लव्ह जिहाद हा मुद्दा भाजपने उचलून धरला आहे. मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेश सारख्या राज्यांमध्ये या कायद्याचे विधेयक आणले जाणार आहे.  या प्रस्तावित विधेयकानुसार फसवणूकीने लग्न केल्यास 5 वर्षाची शिक्षा होणार आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असणार आहे.गुन्हात मदत करणाऱ्या व्यक्तीलाही तुरूंगाची हवा खावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagaland IED Blast: आसाम रायफल्सच्या ताफ्याजवळ IED ब्लास्ट! १ जवान शहीद, ४ जण जखमी; स्फोटानंतर मोठे सर्च ऑपरेशन

Manjari Robbery : मांजरी-मुंढवा रस्त्यावरील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; टॉयलेटची दीड फूट व्यासाची भिंत फोडून दरोडेखोर शिरले दुकानात

शाळेत चिडवायचे 'अफजलखान'; मग मुस्लिम मुलाने शोधला शिवविचारांचा वारसा, 'खालिद के शिवाजी' आता OTT वर, कुठे पाहता येणार?

Leopard Attack in Pune: शिंगवे परिसरात दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला; प्रसंगावधानामुळे जीव वाचला, ग्रामस्थांची पिंजरा लावण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : बलात्कार प्रकरणातील आरोपीला १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT