Eknath Shinde 
मुंबई

Ekanth Shinde: "ठाकरेंच्या गळ्यातला पट्टा डॉ. एकनाथ शिंदेनी काढला"; मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन सोहळा शिंदे गटाकडून नेल्को सेंटरमध्ये पार पडला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला पट्टा डॉ. एकनाथ शिंदे यांनी काढला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर टोकदार टीका केली. शिवसनेच्या ५७ व्या वर्धापनदिनी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. शिंदे गटाच्यावतीनं नेल्को सेंटरमध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. (ShivSena 57th Anniversary Mumbai Eknath Shinde taunt on Uddhav Thackeray)

"मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार होताना उद्धव ठाकरेंनी काय नाय ते सगळं केलं. वर्षावरुन खाली जाताना आम्हाला घरातून बाहेर काढलं, आमच्यावर अन्याय झाला असं ते सांगत होते. यावेळी त्यांच्या गळ्यावर पट्टा होता. मोठ्या मोठ्या बॅगा वर्षाबाहेर चालल्या होत्या. काही लोकांना या बॅगा घ्यायला सांगितलं.

काही लोकांना रडायला लावलं होतं, पण सत्ता येते जाते एवढं मनाला लावून घ्यायचं नसतं. पण दुसऱ्या दिवशी गळ्यातला पट्टा गायब! सगळं गायब, तरातरा माणूस चालायला लागला. ही कोणाची करामत माहिती आहे का? डॉ. एकनाथ शिंदेची ही करामत आहे, अशा शब्दांत CM शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

दरम्यान, आपलं सरकार आल्या आल्या आपण मुंबईतले खड्डे बुजवले, काँक्रिटचे रस्ते केले, कंत्राटदाराचे पैसे कोणाच्या तिजोरीत जाता कामा नये ते लोकांच्या कामासाठी वापरले जायला हवेत, असे निर्णय घेतले. मुंबई बदलते आहे बघता आहात ना आपण? मुंबई स्वच्छ होत आहे सुंदर होत आहे.

पण निवडणुका आल्या की तुमचं राजकारण सुरु होतं की, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. सत्ता आल्या आल्या मी आणि फडणवीसांनी निर्णय घेतला की एकामागून एक प्रकल्प आणले, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या सरकारची कामगिरी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Marathi News Live Updates: नाशिक-पेठ रस्त्यावर भीषण अपघात; टेम्पो आणि दुचाकीला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

जमिनीवर बसला, वरपून कोळंबीचं कालवण खाल्लं! स्मिता यांनी सांगितला रणबीर कपूरचा तो किस्सा, म्हणाल्या- तो इतका...

SCROLL FOR NEXT