Rutuja Latke Sakal
मुंबई

Andheri ByElection : ऋतुजा लटकेंविरोधात शिंदे गटाचं षडयंत्र; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

जाणीवपूर्वक लटके यांना उमेदवारी न मिळण्यासाठी प्रयत्न केला जातोय.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अंधेरी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर जाहीर झाला आहे. या ठिकाणचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी आता उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांचा महापालिकेतील सेवेचा राजीनामा जाणूनबुझून मंजूर केला जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यामागे शिंदे गटाचं षडयंत्र असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. (ShivSena Anil Parab press Rutuja Latke Andheri ByElection BMC Mumbai News)

परब म्हणाले, शिवसेनेच्यावतीनं ऋतुजा रमेश लटके यांची उमेदवारी जाहीर केली होती. रमेश लटके हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. शिवसेनेचं शाखा प्रमुख म्हणून त्यांनी अंधेरीत काम सुरु केलं होतं. तीन टर्म ते नगरसेवक होते. त्यानंतर ते आमदार झाले. कडवा शिवसैनिक म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून शिवसेनेच्यावतीनं त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी असा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या पत्नी महापालिकेत लिपिक म्हणून काम करतात. त्यांना आम्ही उमेदवारी देऊ असं सांगितलं त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, निवडणूक झाल्यानंतर माझा राजीनामा मंजूर करावा. पण राजीनामा देण्याची ही पद्धत नाही, असं उत्तर महापालिकेनं देत त्यांना पुन्हा नव्यानं राजीनामा देण्यास सांगितला, तसा त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. पालिकेचा असा नियम आहे की एक महिना आधी राजीनाम्याची सुचना द्यावी लागते. जर एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नसेल तर तुम्हाला एक महिन्याचा पगार ट्रेझरीत द्यावा लागतो.

मुंबई पालिकेच्या आयुक्तांवर दबाव

दरम्यान, ऋतुजा लटके यांच्यावर कुठलीही शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. त्यांचे महापालिकेत कसलेही ड्यू नाहीत. त्यांनी सर्व कागदपत्रे महापालिकेत सादर केली आहेत. पण महापालिका आयुक्त त्यांचा राजीनामा मंजूर करत नाहीत त्यांच्यावर तसा दबाव आहे. मी स्वतः तीन वेळा महापालिका अधिकाऱ्यांना भेटलो पण ते टाळाटाळ करत आहेत. हा राजीनामा आयुक्तांकडे जाण्याचा प्रश्नच नाही कारण त्यांचा राजीनामा सहआयुक्तांकडेच मंजूर होतो, असं परब यांनी सांगितलं.

लटकेंच्या राजीनाम्यासाठी कोर्टात धाव

सध्या फाईल फिरवण्याचा खेळ महापालिकेत सुरु आहे. माझी स्पष्ट मागणी आहे ऋतुजा लटके यांनी घाबरण्याचं कारण नाही. त्यांना विविध प्रकारे शिंदे गट त्यांच्यावर दबाव टाकत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत. आमच्याकडूनच निवडणूक लढवाल तरच राजीनामा मंजूर होईल तसेच मंत्रीपदाचीही त्यांनी ऑफर देण्यात आल्याचं कळत आहे. आता निवडणूक अर्ज भरायला केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळं हा जो खेळ सुरु आहे त्यासाठी आम्ही शिंदे गटाचा निषेध करतो. यासाठी आता आम्ही कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होईल, अशी माहिती यावेळी परब यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! आयात शुल्क वाढीनंतर आज सर्वात कमी दर; उच्चांकापासून तब्बल 23 हजारांनी स्वस्त; पाहा ताजे भाव

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Sugarcane farmers: नेत्यांच्या साखरसाम्राज्यात अडकले शेतकऱ्यांच्या घामाचे २१८ कोटी; सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांकडे १२८ कोटींची थकबाकी

Firefly Festival: काजवा महोत्सवाची परदेशी पर्यटकांना भुरळ; जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमधील निसर्गप्रेमी अकोल्यात

Rajat Patidar: ट्रॉफी जिंकताच कॅप्टन रजत पाटीदारचा मोठा खुलासा, हे सगळं आधीच ठरलेलं होतं' म्हणत नेमकं काय बोलून गेला? पाहा..."

SCROLL FOR NEXT