मुंबई

मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा म्हणत शिवसेनेचा आज गुजराती मेळावा

पूजा विचारे

मुंबईः  आज मुंबईत शिवसेनेचा गुजराती समाजासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अंधेरी-ओशिवरा येथील गुजरात भवनातील नवनीत हाँलमध्ये हा मेळावा सकाळी १० वाजता होणार आहे. या मेळाव्यात १०० गुजराती व्यापारी उपस्थित रहाणार आहेत. यावेळी ११ गुजराती उद्योगपती शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत.

गेल्या आठवड्यात मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा मुंबईतल्या गुजराती बांधवांना साद घातली. पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहेत. त्यात सत्ताधारी शिवसेनेनंही पालिकेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. शिवसेनेनं मुंबईसह राज्यातील गुजरात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं दिसतंय.

शिवसेनेनं १० मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेची गुजराती लोकांना जागृत करण्याची आगळी वेगळी मोहीम राबवली आहे. त्यासाठी शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित केला आहे.  मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा या मथळ्याखाली हा मेळावा होत आहे.

शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी गुजराती आणि मराठी भाषेत निमंत्रण पत्रक देखील छापण्यात आली आहेत.

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंचं केम छो वरळी 

आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते. त्यावेळी त्यांनी लावलेल्या बॅनर्सची चर्चा चांगली रंगली होती. वरळीतून आदित्य यांची उमेदवारी घोषित केल्यानंतर अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेकडून केम छो वरळी असे गुजराती भाषेतले पोस्टर्स लावण्यात आले होते. 

Shivsena meet Jogeshwari gujarati bmc election 2022 ma jalebi na fafda uddhav thackeray apda

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT