narendra modi uddhav thackeray 
मुंबई

भाजपाने भुंकायचं आणि ईडीने धावत सुटायचं - शिवसेना

अदानींच्या बंदरात सापडलेल्या 21 हजार कोटींच्या ड्रग्जवर इतना सन्नाटा क्यो हैं ? माध्यमं गप्प? शिवसेनेचा सवाल

वैदेही काणेकर

मुंबई: "ईडीची (ed) रोजच महाराष्ट्रात कारवाई सुरु असते. आज ईडीने कोणावर कारवाई केली ते माहित नाही. ईडीचं कार्य म्हणजे भाजपाच (bjp) उपकार्य. त्यांनी भुंकायचं आणि यांनी धावत सुटायचं, अशा पद्धतीचं काम सुरु आहे" अशी टीका शिवसेना (shivsena) खासदार आणि प्रवक्ते अरविंद सावंत (arvind sawant) यांनी केली. शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावलय. त्यावर अरविंद सावंत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

"देशात सीबीआय, ईडी, नार्कोटिक्स या अशा अभिमान वाटणाऱ्या संस्था आहेत. त्या संस्थांच अवमूल्यन मागच्या ५० वर्षात घडलं नाही. ज्या पद्धतीने ईडी किंवा नार्कोटिक्स खातं २५ ग्रॅम ड्रग्ज कुठेही मिळालं तरी आरडाओरडा होत होता. गुजरातच्या मुंद्रा बंदरात २१ हजार कोटीचे ड्रग्ज मिळाले, त्यावर सन्नाटा क्यो हैं. माध्यमं गप्प का? याचं उत्तर मिळालं पाहिजे" असे अरविंद सावंत म्हणाले.

"महाराष्ट्रात जरा काही झालं की, गदारोळ करायचा प्रयत्न सुरु होतो. तिथे गुजरातमध्ये अदानींच्या एका बंदरावर कंटेनरमध्ये २१ हजार कोटीचं ड्रग्ज मिळालं. याचा अर्थ पूर्वी तिथे हे ड्रग्ज येत होते. सीबीआयने यावर काय कारवाई केली ते कळूं दे, कोण पैसे गुंतवतोय ते पण कळूं दे" असे अरविंद सावंत म्हणाले.

महाविकास आघाडी खासकरुन शिवसेनेला ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जातोय. त्यासंबंधीच्या प्रश्नावर सावंत म्हणाले की, "हाच एकमेव उद्योग आहे, सत्ता त्यासाठी हे सर्व सुरु आहे. बाळासाहेब म्हणायचे सत्ता हे साधन आहे, साध्य नव्हे. भाजपासाठी सत्ता साध्य आहे. ज्याचा वापर विरोधकांना छळण्यासाठी केला जातोय. गुजरातमध्ये अदानीचं बंदर आहे. काय कारवाई झाली ते देशाला कळलं पाहिजे "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT