Mumbai Sakal
मुंबई

ओळखपत्र दाखवा आणि लस घ्या ; विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवणार

3 लाख विद्यार्थ्यांना लाभ

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महिलांच्या यशस्वी अभियानानंतर मुंबई (Mumbai) महानगरपालिका (Municipal) आता फक्त विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण (Vaccination) मोहीम राबवणार आहे. आठवड्याभरात ही मोहीम राबवण्यात येणार असून 18 वर्षावरील बहुतांश विद्यार्थ्यांचं (Students) लसीकरण (Vaccination) करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

मुंबईत बाराशेहून अधिक महाविद्यालये आहेत. त्यात 7 लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील साधारणता 3 लाख विद्यार्थी 18 वर्षावरील आहेत. त्यातील निम्म्या विद्यार्थ्यांनी लस घेतली असण्याची शक्यता आहे. लसीकरणाचा टक्का मात्र तुलनेने कमी आहे. त्यामुळे विशेष मोहीम राबवून हा टक्का वाढवण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे.परदेशी जाणाऱ्या 28,903 विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे.

मुंबईतील महाविद्यालये सध्या ऑनलाइन सुरू असले तरी अनेक विद्यार्थ्यांना काही कारणास्त्व घराबाहेर फिरावे लागते. शिवाय ऑक्टोबर मध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने लहान आणि किशोर वयीन मुलांना या लाटेचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच जर कोविड ची तिसरी लाट रोखण्यात यश आले तर महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे 18 वर्षा वरील बहुतांश विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यावर जोर देण्यात येत आहे.

आठवड्याभरात एक दिवस निवडून ही विशेष मोहीम राबविण्यात येईल. या दिवशी फक्त विद्यार्थ्यांचे लसीकरण होईल. घराजवळील केंद्रांवर जाऊन विद्यार्थ्यांना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आपले महाविद्यालयीन ओळखपत्र दाखवावे लागेल. ज्या विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र नसेल त्या विद्यार्थ्याला आपली विद्यार्थी म्हणून ओळख पटवून देणारं कोणतही ओळखपत्र दाखवून लस घेता येणार आहे. या विशेष मोहिमेसाठी महापालिकेकडून तयारी सुरू असल्याचे ही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

-एकूण महाविद्यालय - 750

-विद्यार्थी संख्या - 7 लाखाहून अधिक

-18 वर्षावरील विद्यार्थी

- 3 लाखाहून अधिक

महिला विशेष लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. अश्याच प्रकारे विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्याचे विचाराधीन आहे. मुंबईतील लसीकरण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न आहे.

-सुरेश काकाणी , अतिरिक्त आयुक्त , मुंबई महानगरपालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT