mumbai rain update  sakal
मुंबई

Mumbai Rain Update : सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे हाल! सिग्नल बिघाड, लोकल सेवेला फटका

सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. शुक्रवारी मध्य रेल्वेवरील उंबरमाळी ते कसारा दरम्यान डाऊन दिशेकडे सिग्नल बिघाड झाला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे. शुक्रवारी मध्य रेल्वेवरील उंबरमाळी ते कसारा दरम्यान डाऊन दिशेकडे सिग्नल बिघाड झाला. या बिघाडाने मध्य रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले. गर्दीच्यावेळी हा बिघाड झाल्याने स्थानकात आणि लोकलमध्ये गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९.१५ च्यादरम्यान उंबरमाळी ते कसारा दरम्यान डाऊन दिशेकडे सिग्नल बिघाड झाला. त्यामुळे कसारा कडे जाणाऱ्या लोकल गाड्या एका मागे एक खोळंबल्या होत्या. या घटनेमुळे कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कसारा दोन्ही दिशेकडील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावल्या.

या घटनेची माहिती मिळताच, मध्य रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल होऊन हा बिघाड सकाळी १०.१५ वाजच्या सुमारास दुरुस्त करण्यात आलेला आहे. मात्र या घटनेमुळे लोकल सेवा दुपारनंतरही उशिराने धावत आहेत. तसेच दुपारी मुंबई आणि उपनगरात पावसाचा जोर वाढल्याने लोकसेवा विलंबाने धावत होत्या त्यामुळे शुक्रवारी मुंबईकरांना कार्यालयात पोहोचण्यासाठी लेटमार्क बसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT