पाली : जॅक ॲण्ड जिल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आलेले परदेशी पाहुणे. 
मुंबई

परदेशी पाहुण्यांची जॅक ॲण्ड जिल शाळेत हजेरी

सकाळ वृत्तसेवा

पाली (वार्ताहर) : पालीतील जॅक ॲण्ड जिल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला कॅनडा, जर्मनी व इंडोनेशियातील परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. त्यांनी या चिमुकल्यांच्या कलागुणांचे आणि भारतीयांचे कौतुक केले.

पालीत प्रथमच अशा प्रकारे एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली आहे. या वेळी परदेशी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेत सूत्रसंचालन केले. याबरोबरच वेगवेगळ्या कार्यक्रमातून कलागुणांचे सादरीकरण केले. या वेळी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण, बौद्धिक क्षमता, कल्पकता व नृत्याविष्काराचे परदेशी पाहुण्यांनी तोंडभरून कौतुक केले.

शाळेच्या संचालिका प्रभा द्रविड व स्थानिक मान्यवरांनी केलेल्या सत्काराने परदेशी पाहुणे भारावून गेले. या वेळी पाहुण्यांनी आपल्या मनोगतात भारत देश हा विविध जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा व वेशभूषा आदींनी नटला आहे. भारतातील नागरिक हे अत्यंत प्रेमळ व संस्कारप्रिय आहेत. या देशात ‘अतिथी देवो भव’ ही महान संस्कृती व विचार प्राचीन काळापासून आजही जैसे थे टिकून असल्याचे आम्हास अनुभवयास मिळाले. लहान मुलांमधील सुप्त कलागुणांचे कौतुक करावे तितके कमीच. आज आपण दिलेले उदंड प्रेम व केलेल्या हृद्यसत्काराने आम्ही भारावून गेलो आहोत, अशा प्रतिक्रिया पाहुण्यांनी दिल्या.

या वेळी स्वच्छ भारत अभियान उपक्रमाला गती देणारे कार्यक्रमही चिमुरड्या मुलांनी सादर केले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, संचालिका प्रभा द्रविड, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपत सीतापराव, सुजित बारसकर, धनंजय पांडव, सूरज मेंडण आदींसह मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. 

दिवसागणिक वाढत असलेले प्रदूषण सजीवसृष्टीला मारक व घातक ठरत आहे. अशातच आपण प्रत्येकाने स्वच्छ व समृद्ध भारत घडवण्यासाठी योगदान देऊया. आपल्या मुलांना प्रदूषणविरहित भारत देण्यासाठी सज्ज होऊया. 
- प्रभा द्रविड, संचालिका, जॅक ॲण्ड जिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT