devendra fadnavis and  
मुंबई

ST Bank : बँकेच्या प्रत्येक शाखेत फडणवीसांचे तैलचित्र लावण्याचे सदावर्तेंचे निर्देश; विजयानंतर सक्रिय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेतील संचालक मंडळाच्या विजयानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी जाहिर प्रतिक्रीया दिली. सदावर्ते नत्थुराम गोडसे याचा एकेरी उल्लेख केल्यावरून माध्यमांवर भडकले आहे. गोडसे याला सन्मान द्यायला पाहिजे असे सदावर्ते यांचे म्हणणे होते. शिवाय बँक प्रशासनाला त्यांनी निर्देशही दिले आहेत.

एसटीच्या मध्यवर्ती बँकेची निवडणूकीत विजय मिळवल्यावर सोमवारी (ता.२६ जून) गुणरत्न सदावर्ते यांनी गोडसे यांचे पोस्टर्स फडकवले, गोडसेच्या जयजकार केला होता. उपमुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर सदावर्ते यांनी आपली भूमिका मवाळ केली. मात्र मंगळवारी बँक मुख्यालयातून बोलताना महात्मा गांधी यांचा उल्लेख नेहमीप्रमाणे बॅरीस्टर एम के गांधी असाच केला.

दरम्यान आजपर्यंत शरद पवार यांनी केलेलं राजकारण बालिश राजकारण होत. शरद पवारांचे विचार संपवण्याचे काम आम्ही केलं. आम्ही शरद पवार नावाचा विषाणू व्हायरस या निमित्तानं संपवला आहे. बँकेकडून लवकरच परिपत्रक काढून, वंदे मातरम म्हणण्याच्या सुचना द्यावात. प्रत्येक शाखेत नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमन, देवेंद्र फडणवीस यांची तैलचित्र प्रत्येक शाखेत लावण्याचे निर्देश सदावर्ते यांनी एसटी बँक प्रशासनाला निर्देश दिले.

बँकेत परवानगी शिवाय बेकायदेशीर पत्रकार परिषद घेतलीच कशी? हे कृत्य बेकायदेशीर असून या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार द्यावी, असा प्रश्न महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT