ST  Sakal
मुंबई

ST Crime: बस पकडून पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना पोलिसांनी केली अटक!

Chinmay Jagtap

कल्याण एसटी स्थानकातून बस पकडून बाहेर गावी जाण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघा चोरांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (ता. ७) बेड्या ठोकल्या. नरेश जैसवाल (वय ४०) व अनिल शेट्टी वय ४५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सहा गुन्ह्यांची उकल केली असून तीन लाख ७३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अटक केलेले दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून खोटी बतावणी करून लोकांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवून ते फसवणूक करत असत. ते दोघेही कल्याण बसस्थानकात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे हवालदार किशोर पाटील व पोलिस शिपाई रवींद्र लांडगे यांना मिळाली होती.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, संजय माळी, किशोर पाटील, विलास कडू, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, अनुप कामत, सचिन वानखेडे, रवींद्र लांडगे, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, विनोद चन्ने, विजेंद्र नवसारे, अमोल बोरकर,

गुरुनाथ जरग यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी सव्वासात वाजता कल्याण एसटी बस स्टॅण्ड परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून सहा गुन्ह्यांतील तीन लाख ७३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT