DOCTOR
DOCTOR 
मुंबई

MD आणि MS च्या परीक्षांंबाबत लवकरच निर्णय घेणार; राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती.. 

- सुनीता महामुणकर

मुंबई : कोरोना साथीच्या पाश्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर एमडी आणि एमएस अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी देण्यात आली.

कोविड19 साथीमुळे आतापर्यंत दोन वेळा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. डॉक्टर निशांत गब्बूर यांनी परीक्षा बाबतीत स्पष्टता मिळण्यासाठी न्यायालयात याचिका केली आहे. न्या शाहरुख काथावाला आणि न्या व्हि जी बिश्त यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर व्हिडीओ कौनफरन्सिंगमध्ये सुनावणी झाली. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एमडी आणि एमएस अंतिम वर्षांच्या वेळापत्रकाबाबत तपशील दाखल करावा, अशी मागणी याचिकेत केली आहे. राज्य सरकार यासंदर्भात कार्यवाही करत आहे. तसेच परीक्षांंबाबत सर्व प्रकारे विचार केला जात असून सुरक्षातत्वांंचाही अभ्यास केला जात आहे. कारण अनेक निवासी डॉक्टर आणि परीक्षक सध्या कोविड कर्तव्यावर आहेत आणि त्यांच्याशी निगडित ही बाब आहे, अशी माहिती सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी खंडपीठाला दिली. यावर सविस्तर माहिती देण्यासाठी अवधी देण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी ता. 14 रोजी निश्चित केली. 

याचिकादार गब्बूर परळ येथील सेठ जी एस वैद्यकीय महाविद्यालयात एमएस (जनरल सर्जरी) शिकत आहे. चंदिगड मेडिकल एज्युकेशन एण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या डीएम-एमसीएच प्रवेश परीक्षेत (न्युरोसर्जरी - सर्वसाधारण गट) त्यांना संपूर्ण देशातून दुसरे स्थान मिळाले आहे. त्यांना महाविद्यालयाकडून प्रवेशपत्र मिळाले असून ता. 6 जुलैपर्यंत  रुजू व्हायचे होते. 

मात्र एमडी किंवा एमएस किंवा त्या श्रेणीतील भारतीय मेडिकल कौन्सिलची परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही आरोग्य विद्यापीठाची परीक्षा झालेली नाही, त्यामुळे चंदिगढ महाविद्यालयातील प्रवेश रद्द होईल का, अशी चिंता त्यांनी याचिकेत व्यक्त केली आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

state government will take decision of MS and MD exams 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT