police 
मुंबई

वज्रेश्वरी मंदिरातील दरोड्याचा यशस्वी तपास; आरोपी गजाआड 

दीपक हिरे

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या वज्रेश्वरी मंदिरात मागील आठवड्यात दरोडा पडला होता. यावेळी दानपेटीतील सुमारे 8 ते 10 लाखस 2 रुपये लांबवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे ग्रामीणची स्थानिक गुन्हे शाखा करत होती. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी आपले तपास कौशल्य वापरून या दरोड्याची उकल केली. सर्व आरोपी आणि दरोड्यातील रक्कम हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या यशस्वी कामगिरी बद्दल पोलिसांचे विशेषतः स्थानिक गुन्हे शाखा या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.


पहाटेच्या वेळी 5 दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधून वज्रेश्वरी येथील मंदिरात प्रवेश केला.  सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याला बांधून ठेऊन देवीच्या दानपेटीतील सर्व रक्कम लंपास केली होती. दरोडेखोरांनी आपला चेहरा लपवला होता त्यामुळे तसे तपासाचे धागेदोरे हाती लागणे अवघड होते. त्यात जनतेतून तपास लवकर व्हावा म्हणून दबाव वाढत होता. पोलीस अपयशी ठरतात असा आरोप करत काही नेत्यांनी हा तपास सीआयडीकडे द्यावा अशीही मागणी केलेली. या सर्व दबावात जराही विचलित न होता एलसीबीची स्पेशल टीम आणि गणेशपुरी पोलिस ठाण्याचे कर्मचारी अशी पूर्ण टीम दिवस रात्र काम करत होती. मोबाईल सिडीआर, सीसीटीव्ही फुटेज हे केवळ दोन माध्यम होते, अशा परिस्थितीत सतत काम करत या टीमने आरोपींचा सुगावा लावला.  टीममध्ये असलेले स्थानिक कर्मचारी आपल्या अनुभवाचा कस लावत होते, एलसीबीचे सह पोलिस निरीक्षक बडाख हे सतत आपल्या टीमला ऍक्टिव्ह ठेवत काम करत होते. अशा सततच्या परिश्रमानंतर आरोपी हे फासेपारधी किंवा परप्रांतीय नसून स्थानिक आहेत हे आधी निष्पन्न झाले. मग त्यांची लोकेशन ट्रॅक करणे सुरू झाले, शहापूर, वाडा, जव्हार ते दिव दमन असा पाठलाग सुरू झाला आणि अखेर या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. 

आरोपींच्या अटकेनंतर लगेचच त्यांच्याकडे असलेली दरोड्यात लांबवलेली रक्कम रुपये 2 लाख 83 हजार पोलिसांनी हस्तगत केले. यात आरोपी 1गोविंद सोमा गिम्भल (दाभलोन, ता.जव्हार) , विनित सुरजी चिमडा, भारत लक्ष्मण वाघ, जगदीश काशीनाथ नावतरे, प्रवीण काशिनाथ नावतरे (सर्व रा.गरेल पाडा,अघई, ता.शहापूर) हे आरोपी अटकेत आहेत. 

पोलिस अधीक्षक, डॉ.शिवाजी राठोड, अति. पोलिस अधीक्षक संजय पाटील, एलसीबी पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली या तपास कामी दिवस रात्र काम केलेले पोलिस अधिकारींसह पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक विशाल वायकर, अभिजित टेलर, स.फौ.अनिल वेढे, पो हवा. अर्जुन जाधव, पो.ना. अशोक पाटील, संजय शिंदे, पुष्पेन्द्र थापा,प्रदीप टक्के, हनुमंत गायकर, दीपक गायकवाड, मनोज चव्हाण, पोलीस शिपाई सतीश जगताप, राजेश श्रीवास्तव, गणेश सिरसाट, भगीरथ मुंडे या पथकाने अत्यंत परिश्रम घेऊन या गुन्ह्याची उकल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीतील आंदोलनासह दिवसभरातील सर्व घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT