मुंबई

शानदार विजय! 45 दिवसांच्या लढाईनंतर 80 वर्षीय आजोबा कोरोनामुक्त; नायर रुग्णालयात यशस्वी उपचार

भाग्यश्री भुवड : सकाळ वृत्तसेवा


मुंबई : 80 वर्षीय छोटेलाल ठाकुर तब्बल 45 दिवसांनी कोरोनाचे उपचार घेऊन घरी परतले आहेत. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या उपचारांमुळे त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली. नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

ठाकुर यांना जुन महिन्यात श्वसनास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल केले होते. चाचणीमध्ये त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच त्यांना न्यूमोनिया आणि एआरडीएस हा आजारही होता. त्यामुळे डाॅक्टरांनी आधी मशीनद्वारे त्यांच्या शरीरातील आॅक्सिजन पातळी नियंत्रणात आली व नंतर कोरोनासह इतर आजारांवर उपचार केले. त्याला ठाकूर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व अखेऱ यशस्वीपणे त्यांनी कोरोनावर मात केली. आयसीयू विभागाच्या प्राध्यापक आणि प्रमुख डॉ. रोझमेरी डिसोजा यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपचार करण्यात आले आहेत. 
कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिकांचे 81 ते 90 या वयोगटातील मृत्यू होण्याचे प्रमाण 20 टक्के आहे. तर, 91 ते 100 या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचे मृत्यूचे प्रमाण 18 टक्के आहे.   


80 वर्षांच्या छोटेलाला ठाकुर यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. फुप्फुसातील ऑक्सिजनची पातळी न्यूमोनियामुळे कमी झाली होती. मात्र,  टोसीलीझुमॅब या औषधांनी केलेल्या उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला व ते आता आजारातून बरे झाले आहेत. 
-  डॉ. राकेश भदाडे,
सहाय्य्क प्राध्यापक, आयसीयू विभाग

----------------------------------------------------

Edited by Tushar Sonawane 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT