Mumbai Crime: पोलिसांनी पकडला मोठा मासा, 'या' बड्या गुन्हेगाराला केली अटक ! sakal
मुंबई

Mumbai Crime: पोलिसांनी पकडला मोठा मासा, 'या' बड्या गुन्हेगाराला केली अटक !

Drug Crime Latest Update: विक्रेत्यांच्या साखळीबाबत महत्वपूर्ण माहिती हाती येऊ शकेल, असा अंदाज एनसीबी अधिकारी व्यक्त करत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Police Latest Update: रासायनिक अमली पदार्थांमध्ये सर्वात घातक मानल्या जाणाऱ्या मेफड्रॉनच्या(एमडी) तस्करीतील मुख्य आरोपी सुफियान खान याला केंद्रीय अमलीपदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) सोमवारी वाशीतील एका हॉटेलमधून अटक केली.

मुंबई आणि महानगर प्रदेशात एमडी तस्करी व विक्रीत खान याची संघटित टोळी आघाडीवर होती, अशी माहिती एनसीबी अधिकाऱ्याने दिली. खान याच्या चौकशीतून एमडी उत्पादक, तस्कर, विक्रेत्यांच्या साखळीबाबत महत्वपूर्ण माहिती हाती येऊ शकेल, असा अंदाज एनसीबी अधिकारी व्यक्त करत आहेत.

या टोळीबाबत माहिती गोळा करून एनसीबी पथकाने २६ जूनला नागपाडा, दोन टाकी, शिवडी परिसरात छापे घातले होते. त्या कारवाईत मुशर्रफ जान मोहंमद कपाडिया, नौशिन खान, सैफ खान या तिघांना अटक केली. या तिघांच्या ताब्यातून सुमारे ३१ किलो एमडी जप्त करण्यात आले होते.

या तिघांच्या चौकशीतून सुफीयान याचे नाव पुढे आले. मात्र ही कारवाई झाल्यानंतर तो पसार झाला. वरचेवर मोबाईल नंबर आणि ठाव ठिकाणा बदलणारा सुफियान वाशी येथील एका लॉजमध्ये दडून बसल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT