parambir-singh.jpg 
मुंबई

परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाच नकार

दीनानाथ परब

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. 

आज परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

सीबीआय चौकशीसाठी तुम्ही मुंबई उच्च न्यायालयात का याचिका दाखल केली नाही? असे सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वकिल मुकूल रोहतगी यांना विचारले. ते परमबीर सिंह यांच्यावतीन सुनावणीसाठी न्यायालयात हजर होते. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मुकूल रोहतगी यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केलेत, मग त्यांना पक्षकार का बनवले नाही? असा प्रश्न न्यायमुर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने परमबीर सिंह यांना विचारला. 

पोलीस सुधारणांसंदर्भात दिलेल्या निकालाची अंमलबजावणी होत नाही,  हे दुर्देव आहे. ज्यावेळी गंभीर राजकीय परिस्थिती उदभवते, त्याचवेळी पोलीस सुधारणेचा विषय येतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

एनआयएने सचिन वाझेना अटक केल्यानंतर या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली. दरम्यान राज्य सरकारने परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्त पदावरुन गृहरक्षक दलात बदली केली. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन बदली करण्याच्या निर्णयाला सिंह यांनी आव्हान दिले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT