मुंबई

लहान मुलांना सांभाळा... मुलं होताहेत कोरोनाची शिकार! धक्कादायक माहिती आली समोर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 1 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असून गेल्या महिन्याभरात राज्यातील लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाण तिपटीने वाढले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 25 मे रोजी राज्यातील कोरोना बधितांचा आकडा हा 47,021 इतका होता. त्यात 10 वर्षे वयोगटाच्या आतील 1686 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. एकूण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण 3.59 टक्के इतके होते. एक महिन्यानंतर रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली असून आज सरकारकडून 25 जून रोजी प्राप्त आकडेवारीनुसार कोरोना बाधितांची संख्या 1,38,765 इतकी झाली आहे. त्यात 10 वर्षे वयोगटाच्या आतील 4951 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत. एकूण रुग्णसंख्येच्या हे प्रमाण 3.57 टक्के इतके आहे. गेल्या महिन्याभरात लहान मुलांना बाधा होण्याच्या प्रमाण हे तिपटीने वाढले आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे 52 टक्के एवढा असून राज्यात सध्या उपचार सुरू असलेल्या एकूण (ॲक्टीव्ह) रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने 50 टक्क्यांवर कायम आहे. शिवाय राज्यातील प्रयोगशाळांची संख्या देखील वाढवण्यात आली असून ती आता 103 च्या वर गेली आहे. त्यात 60 सरकारी तरी 43 खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. यामाध्यमातून  राज्यातील प्रति दशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण 5847 एव्हढे आहे.तर सध्या राज्यातील मृत्युदर हा 4.69 टक्के इतका आहे.  


*वयोगटानुसार कोरोना बाधित रुग्ण खालीलप्रमाणे

वयोगट        एकूण रुग्ण       टक्केवारी


*00 ते 10      4951            3.57 

*11 ते 20      9109            6.56

*21 ते 30      26139         18.84

*31 ते 40      27461         19.79

*41 ते 50      25046         18.05

*51 ते 60      23949         17.26

*61 ते 70      14500         10.45

*71 ते 80      5861            4.22

*81 ते 90      1586            1.14

*91 ते 100    162               0.2

*101 ते 110   01               0.00

---------------------------------------------------

 एकूण         1,38,765        100.00

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'अरे तेच तेच काय बोलता, काहीतरी वेगळं...' न्यूझीलंड कर्णधाराच्या वॉर्निंगवर सूर्यकुमारचं थेट उत्तर

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

Latest Marathi News Live Update: सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

या मूलांकाच्या लोकांपासून सावध राहा ! अंतर्ज्ञानी असतात हे लोक; भविष्यातील घटना आधीच समजतात

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

SCROLL FOR NEXT