file photo 
मुंबई

तनुश्री दत्ताची नाना पाटेकरांविरोधात पुन्हा याचिका 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्या विरोधात आज पुन्हा अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली. गतवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात दत्ता यांनी पाटेकर यांच्याविरोधात विनयभंग आणि गैरवर्तनाची एफआरआय दाखल केली होती.

सन 2008 मध्ये "हॉर्न ओके प्लिज' या सिनेमाच्या चित्रकरणादरम्यान पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप दत्ता यांनी "मीटू' मोहिमेअंतर्गत केला होता. मात्र, पोलिसांनी नुकतेच न्यायालयात "बी समरी' अहवाल दाखल केला. पाटेकर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्याइतपत पुरावे नाहीत, असा अहवाल दिला. या अहवालाविरोधात दत्ता यांनी ऍड. नितीन सातपुते यांच्यामार्फत अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

पोलिसांचा अहवाल बोगस असून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. तसेच आरोपीची, संबंधित प्रतिवादींची नार्को चाचणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad Mobile Shop Robbery: कराडला मध्यरात्री मोबाईल शॉपवर दरोडा; 50 ते 60 लाख रुपयांचे मोबाईल लंपास, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू

OBC Reservation Income Limit : OBC उमेदवारांसाठी मोठी बातमी! क्रिमिलेयरची उत्पन्न मर्यादा 8 वरून थेट 15 लाखांपर्यंत वाढणार? समाज कल्याणमंत्र्यांचे महत्त्वाचे संकेत

El Nino 2027: १०० वर्षांत जे घडलं नाही, ते २०२७ मध्ये घडणार? एल निनोचा भयंकर इशारा

Marathi News Live Updates : लातूरच्या उदगीर मध्ये 2 हजार 134 कोटीचा महाघोटाळा

Waterproof Rakhi Envelopes: राखीसोबत आता भेटवस्तूही पोहोचणार सुरक्षित; ‘वॉटरप्रूफ’ लिफाफे, ‘पार्सल पॅकेजिंग’ सुविधा; पोस्ट विभागाचे नियोजन

SCROLL FOR NEXT