mumbai water supply  sakal
मुंबई

Mumbai Water Supply : पाणी जपून वापरा ; या दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद !

Chinmay Jagtap

Mumbai Water Supply : मुंबई महापालिकेच्या ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयाची तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. परिणामी २४ ऑगस्ट सकाळी १० ते २५ ऑगस्ट सकाळी १० पर्यंत चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर आदी भागातील पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार असल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली

ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक एक व दोनची दुरुस्ती कामे पूर्ण झाली आहेत. ती झाल्यानंतर कप्पा क्रमांक एकमध्ये इनलेटद्वारे (१८०० मिमी) पाणी भरण्याचे काम २४ ते २५ ऑगस्ट रोजी हाती घेण्यात येणार आहे. संबंधित तांत्रिक बाबींच्या गरजेनुसार ‘एम-पूर्व’ व ‘एम-पश्चिम’ वॉर्डातील चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर आदी भागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा २४ आण २५ ऑगस्ट रोजी २४ तासांसाठी बंद राहील, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली आहे. त्यामुळे पुरेसा साठा करून ठेवावा आणि पाणी काटकसरीने वापरा, असे आवाहनही पालिकेने केले आहे.

पाणीपुरवठा खंडित होणारा परिसर

एम पूर्व विभाग

रफिक नगर, बाबा नगर, आदर्श नगर, संजय नगर, निरंकार नगर, २० फिट व ३० फिट रोड, एकता नगर, म्हाडा इमारती, शिवाजी नगर रोड क्रमांक १ ते ६, बैंगणवाडी रोड क्रमांक ७ ते १५, कमला रमण, रमण मामा नगर, अहिल्यादेवी होळकर मार्ग, गौतम नगर, लोटस वसाहत, नटवर पारेख कम्पाऊंड, शंकरा वसाहत, इंडियन ऑईल नगर विभाग, टाटानगर, गोवंडी स्थानक रोड, देवनार पालिका कॉलनी, गोवंडी, लल्लूभाई इमारती, जे. जे. रोड (ए, बी, आय आणि एफ सेक्टर), सी, डी, ई, जी, एच, जे, के सेक्टर, चिता कॅम्प, कोळीवाडा, पायलीपाडा, ट्रॉम्बे, कस्टम रोड, दत्ता नगर, बालाजी मंदिर रोड, एस. पी. पी. एल. इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर, देवनार फार्म रोड, देवनार व्हिलेज रोड, गोवंडी गाव, व्ही. एन. पुरव मार्ग, बी. के. एस .डी. मार्गाजवळील भाग, टेलिकॉम फॅक्टरी, बी. ए. आर. सी. नेव्हल डॉकयार्ड, मानखुर्द, मंडाला गाव, डिफेन्स एरिया, मानखुर्द व्हिलेज, बोरबादेवी, घाटला, बी. ए. आर. सी. फॅक्टरी, बी. ए. आर. सी. वसाहत, गौतम नगर आणि पांजरपोळ.

एम पश्चिम विभाग

पी. एल. लोखंडे मार्ग, शांता जोग मार्ग, पी. वाय. थोरात मार्ग, छेडानगर, श्रीनगर सोसायटी, मुकुंदनगर, एस. टी. रोड, सी. जी. गिडवाणी मार्ग, चेंबूर, इंदिरा नगर, चेंबूर मार्केट, चेंबूर नाका, शेल कॉलनी रोड, एन. जी. आचार्य मार्ग, उमर्शी बाप्पा चौक, घाटला, अमर नगर, मोतीबाग, खारदेव नगर, वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ वसाहत, लाल डोंगर, चेंबूर कॅम्प, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, आतुर पार्क, सुमन नगर, साईबाबा नगर आणि श्यामजीवी नगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kedgaon Crime : केडगावातील गर्भलिंग निदान रॅकेटची व्याप्ती मोठी; दोघेजण अद्याप फरार, आणखी काहींचा सहभाग असण्याची शक्यता

Abdul Sattar: अब्दुल सत्तारांची नाराजी दूर, मुलाचा उमेदवारी अर्ज उद्या माघारी घेणार

Donald Trump: मोज्तबा खामेनेई यांची भेट घेण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा; नेतन्याहू यांच्याशी वादावादीनंतर ट्रम्प यांचा भलताच प्लॅन

Pune Toxic Liquor Case: विषारी दारूसाठी रसायन पुरविणाऱ्या पिता-पुत्राला नवी मुंबईतून अटक; तपासासाठी दहा पथके

Lowest Price Electric Scooter : 50 हजारपेक्षा कमी किंमतीत इलेक्ट्रिक स्कूटर; सगळ्यात स्वस्त आहेत 'या' 3 गाड्या, दमदार रेंज

SCROLL FOR NEXT