चिल्हार- बोईसर रस्त्यावर टेम्पोची कारला धडक  sakal
मुंबई

चिल्हार- बोईसर रस्त्यावर टेम्पोची कारला धडक

कार मधील चार प्रवाशी गंभीर जखमी

नाविद शेख

मनोर : चिल्हार बोईसर रस्त्यावरील नागझरी गावच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास भरधाव वेगातील टेम्पोने कारला पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला होता.कारला मागून जोराची धडक बसल्याने अपघातग्रस्त कार समोरून येणाऱ्या टेम्पोला धडकल्याने अपघात झाला होता. अपघातात कारचा चुराडा झाला असून कार चालकासह चार प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चिल्हार बोईसर रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास बोईसरच्या दिशेने जात असलेल्या ह्युंदाई i20 (MH48A0628) कारला पाठीमागून येत असलेल्या भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिली.कारला धडक बसल्याने कार समोरून येणाऱ्या टेम्पोला (MH04EY 9179)जाऊन धडकल्याने अपघात झाला.यअपघातात कार चालकासह चार प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात कार दबल्याने जखमींना स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने अपघातग्रस्त कार मधून बाहेर काढण्यात आले.अपघातामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे उपचारार्थ नाजिकच्याच अधिकारीलाईफलाईन खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

जखमींची नावे :

छाया वडे(60), गजानन वडे(60), करुणा संखे(58), अशोक संखे (65) चालक देवेंद्र शंकर तलवार अशी जखमींची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Play Off Scenario: गुजरात टायटन्सचा सलग पाचवा विजय! सनरायझर्स हैदराबादला नमवून POINT TABLE मध्ये अव्वल, अनपेक्षित कलाटणी

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सच्या संघात बदल... प्ले ऑफच्या शर्यतीसाठी मिळालं बळ... पुण्याच्या रामकृष्ण घोषच्या जागी एन्ट्री

Triple Accident : रजापूर शिवारात तिहेरी अपघात; वाळू वाहतूक करणारा हायवा पलटी, दोन कारची धडक, चार ते पाच जण किरकोळ जखमी

Amit Satam: पंतप्रधानांच्या 'इंधन बचती'ला मुंबई भाजपचा हरताळ; अमित साटम यांचा २५ गाड्यांचा 'शाही' ताफा वादाच्या भोवऱ्यात!

GT vs SRH Live : टप्पा खाऊन आऊट... अभिषेक शर्मा विचित्र पद्धतीने बाद झाला, कागिसो रबाडाला हसू आवरेना... Video Viral

SCROLL FOR NEXT