Datta Dalvi 
मुंबई

Datta Dalvi: ठाकरे-शिंदे वाद पेटला? दत्ता दळवींच्या गाड्यांची अज्ञातांकडून तोडफोड

ठाकरे गटाच्या दत्ता दळवी यांच्या गाड्यांची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

कार्तिक पुजारी

मुंबई- ठाकरे गटाच्या दत्ता दळवी यांच्या गाड्यांची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काही अज्ञातांनी भांडूपमधील त्यांच्या इमारतीमध्ये शिरून त्यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याचं समजते. (thackeray group datta dalvi controversial statement on cm eknath shinde)

दत्ता दळवी यांच्या वक्तव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दळवी यांच्या घरासमोर थांबलेल्या गाडीची चार ते पाच अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. दळवींच्या वक्तव्यानंतर शिंदेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना होती. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दळवी यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिविगाळ केली होती. त्यामुळे वादाला तोंड फुटले असून दळवी यांना पोलिसांनी आज अटक केली होती. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला जाणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.

दळवी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर हल्लाबोल सुरु केला आहे. खासदार संजय राऊत यांनी दळवी काहीही आक्षेपार्ह बोलले नाहीत असं म्हणाले आहेत. त्यांनी आक्षेपार्ह बोललं असेल तर चित्रपट निर्मात्यांवर देखील अशीच कारवाई केली जावी. कारण, चित्रपटामध्ये अशीच भाषा वापरली जाते, असं राऊत म्हणाले.

दळवी यांच्या वक्तव्यावरुन शिंदे गट आक्रमक झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे यावर बोलताना म्हणाले की, खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याची आमची संस्कृती नाही. बाळासाहेब ठाकरेंची ही शिकवण नाही. सरकारवर टीका करणे हा एकमेव कार्यक्रम त्यांच्याकडे आहे. आता दळवींच्या घरासमोरील गाड्यांची तोडफोड झाल्याने वादाला वेगले वळण लागण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT