मुंबई

पाळीव प्राण्यांचे औषध महिलेला

श्रीकांत सावंत

ठाणे - जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या "ऑक्‍सिटोसीन' औषधाची बिलाशिवाय खरेदी करून ते प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे अघोरी कृत्य करणारा औषध विक्रेता, फार्मासिस्ट आणि वितरक कंपनीच्या विरोधात रविवारी (ता. 20) येथील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाण्यातील एका रुग्णालयात 19 सप्टेंबरला प्रसूतीसाठी एक महिला दाखल झाली होती. या महिलेला "ऑक्‍सिटोसीन' औषधाची विक्री झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पाचपाखाडी येथील लाईफ केअर मेडिकोचे भागीदार रवींद्र शिरोळे, फार्मासिस्ट ललिता झिंझाड आणि मेसिन रेमिडीज्‌ इंडिया या औषध वितरक कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी याबाबतची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाण्यातील पाचपाखाडीतील आधार हॉस्पिटलजवळ लाईफ केअर मेडिको हे औषधांचे दुकान आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक शुभांगी भुजबळ यांनी 24 ऑक्‍टोबरला या दुकानाची तपासणी केली असता "ऑक्‍सिटोसीन'ची विक्री केली जात असल्याचे त्यांना आढळले.

"ऑक्‍सिटोसीन' हे इंजेक्‍शन मेसिन रेमिडीज्‌ इंडिया ही कंपनी तयार करते. विशेष म्हणजे या इंजेक्‍शनवर मानवी वापरासाठी नाही, अशी सूचना असतानाही आधार रुग्णालयात 19 सप्टेंबरला प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलेला बिलाशिवाय त्याची विक्री करण्यात आली होती.

औषधाचा प्रवास
लाईफ केअर मेडिको यांनी हे इंजेक्‍शन श्री जैन फार्मा (ठाणे) यांच्याकडून; तर त्यांनी युनायटेड फार्मा (कामोठे) यांच्याकडून खरेदी केले होते. युनायटेड फार्माने ते गाझियाबाद येथील रोमॅक्‍सो फार्माकडून खरेदी केले होती; तर या औषधाचे उत्पादन नवी दिल्लीतील सेक्‍टर सातमधील मेसिन रेमिडीज्‌ इंडिया कंपनीमध्ये करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result 2026 : एकटा बास! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ३ मंत्री, २ खासदार, १० आमदारांना पुरून उरले सतेज पाटील; वाचा विजयी उमेदवारांची फायनल यादी

Gokul Election Satej Patil : गोकुळच्या मतमोजणी केंद्रावर गोंधळ; सतेज पाटील यांची तातडीने धाव अभिजित तायशेटे आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

Latest Marathi News Live Update : प्यारे खान यांच्या भेटीनंतर गरबा मंडळाचं शुद्धीकरण

Gold For India : अचूक निशाणा अन् नवा इतिहास! पॅरा नेमबाज मोना अग्रवालने जिंकलं 'सुवर्णपदक'; पंतप्रधानांची भावूक पोस्ट

Asian Para Games 2026: भारतीय खेळाडूंचा ऍथलेटिक्समध्ये सुवर्ण व रौप्य पदकांचा 'डबल धमाका'! सौम्या, राधा अन् रिंकू-अजीतची कमाल

SCROLL FOR NEXT