सरकारी नोकरीचे अमिष दाखवून लुटणारी टोळी अटकेत 
मुंबई

सरकारी नोकरीचे अमिष दाखवून लुटणारी टोळी अटकेत

श्रीकांत सावंत

ठाणे : रेल्वे, जलसिंचन, सार्वजनिक बांधकाम विभाग, सेल्स टॅक्स, आरटीओ, एक्साईज विभाग, पोस्ट ऑफीस, महाराष्ट्र पोलिस दल, एमएसईबी या सरकारी यंत्रणांमध्ये पैसे देवून नोकरी देण्याचे अमिष दाखवणाऱ्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. कनिष्ठ लिपिक, हेल्पर, शिपाई, ड्रायव्हर, पोलिस या पदापासून ते थेट पोलिस उप निरीक्षक पदापर्यंतच्या नोकरी देण्याचा दावा ही मंडळी देत होती. या प्रकरणी 61 जणांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या असून, त्यांना सुमारे दीड कोटी रुपयांना फसवल्याचे समोर आले आहे. पाच आरोपींनी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून खोटे सॅंम्प, खोटे नियुक्ती पत्र, सरकारी प्राधिकरणाचे, उच्चस्तरिय अधिकाऱ्यांचे नावे शिक्के व खोट्या सह्या करून ही टोळी आपला कार्यभार साधत होती, अशी माहिती अपर पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.

नाशिकमधील सटाणा तालुक्यातील नामपुर रोड येथे राहणारे दिलीप पाटील (वय 63) यांचा शेतीचा व्यवसाय असून, त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी लावायची असल्याने एका मध्यस्थाने त्यांना भांडूप येथील दिनेश लहारे याच्याशी संपर्क साधण्याचास सांगितले. लहारे याने मंत्रालयामध्ये ओळख असल्याचे सांगून पाटील यांचा मुलगा मयुर यास व अन्य मुलांना पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याचे अश्वासन त्यांनी दिले. तसेच त्यांना ठाण्यात बोलवून त्यांच्याकडून 17 लाख 50 हजार रुपये घेतले. परंतू वारंवार संपर्क करूनही त्यांना नोकरी मिळाली नसल्यामुळे अखेर त्यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखा घटक एकचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन ठाकरे यांच्याकडून तपास सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणी सापळा रचून दिनेश लहारे यास भांडूप रेल्वे स्टेशनजवळ स्नेहा कंप्युटर स्टेशन प्लाझा येथील बेसमेंटमधून अटक केली. तसेच त्याचे अन्य चार साथिदारांनाही पोलिसांनी अटक केले. बीए पर्यंत शिक्षण पुर्ण झालेल्या लहारे बेरोजगार तरूणांना फसवून त्यांच्याकडून दोन लाख ते पाच लाखापर्यंतची रक्कम स्विकारत असून त्याने आत्तापर्यंत 61 जणांकडून दीड कोटीहून अधिक रक्कम उकळल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस आयुक्त परमबीर सिंग, सह पोलिस आयुक्त मधुकर पाण्डेय, पोलिस उप आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.

सरकारी आदेशांची हुबेहुब नक्कल...
सरकारी नोकरीचे खोटे आदेश आणि नियुक्ती पत्रक देताना ते अत्यंत हुबेहुब वाटतील यासाठी आरोपी लहारे इंटरनेटचा वापर करत होता. त्या विभागातील अधिकारी, त्यांच्याकडून दिली जाणारी नियुक्ती पत्रके यांचा इंटरनेटवरील अभ्यास दांडगा होता. या आरोपींनी एका तरूणास पोलिस उप निरिक्षक पदाचे हुबेहुब पत्र देऊन त्याला ट्रेनिंगलाही धाडण्यात येणार असल्याचे सांगितले होते. रेल्वेमध्ये टीसी, हेल्पर, जलसिंचन आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अभियंता, शिपाई, हेल्पर, ड्रायव्हर अशा नोकऱ्या देण्यासाठी तसेच सेल्स टॅक्स, आरटीओ, एक्साईज, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र पोलिस दलामध्येही नोकरीचे आमिष त्यांनी दाखवले होते.

मंत्रालयात साहेब असल्याचे दावे...
पोलिसांनी टेंभीनाक्यावरील विनय दळवी, भांडूप मधील शंकर कोळसे-पाटील, नाशिक मधील रमेश देवरे, घोडबंदर रोड वरील प्रविण गुप्ता यांना अटक केली आहे. ही मंडळी मंत्रालय परिसरात किंवा सरकारी कार्यालयाच्या परिसारामध्ये उभे राहत असतात. यापैकी एक जण बेरोजगार तरूणाला त्यांच्याकडे आणून हे त्या विभागाचे साहेब असल्याचे सांगत. तसेच त्यांना पैसे दिल्यानंतर खोट्या प्रमाणपत्र बेरोजगार तरूणाला दिले जात होते. यापैकी लहारे याच्यावर अहमदनगरमधील संगमनेर आणि कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. मद्यविक्रीचे परवाना देण्याच्या नावाखाली त्याने दोन जणांना फसवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा घटक एक चे सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप बागुल तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT