मुंबई

BMC ची अफलातून आयडिया! ताप असेल तर सायरन वाजणार...

समीर सुर्वे : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात प्रवेश करण्यापुर्वी सुरक्षा रक्षक थर्मल गनने कर्मचारी, नागरीकांचा उष्णांक मोजत आहे.हे चित्र आता बदलले आहे. प्रभादेवी येथील जी दक्षिण प्रभाग कार्यालयात थर्मल स्कॅनर बसविण्यात आला असून स्कॅनर समोर उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीचा उष्णांक सामन्य पेक्षा जास्त असल्यास सायरन वाजणार आहे.

जी दक्षिण विभाग हा एप्रिल मे महिन्यात हॉटस्पॉट होता. अशा परिस्थितीत पालिकेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत होते. कार्यालयात आल्यावर लिफ्ट, नळ तसेच इतर माध्यमातून कोविडचा संसर्ग होण्याचा धोका होता. त्यावर प्रभागातील अधियंत्यांनी पायाने उघडणारी लिफ्ट, पायाने बटन दाबून बेसीनमध्ये येणारे पाणी असे प्रयोग केले होते. त्या पुढे जाऊन लिफ्ट मधून ज्या मजल्यावर जायचे आहे.ते बटनही पायाने दाबता येत आहे.त्याच बरोबर प्रवेशव्दारावर थर्मल स्कॅनर बसवण्यात आला आहे.त्या स्कॅनर द्वारे स्वयंचलित पध्दतीने उष्णांक मोजला जातो.

महापालिकेच्या अभियंत्यांनी कल्पकतेने ही यंत्रणा तयार केली असल्याचे सहाय्यक आयुक्त शरद उघाडे यांनी सांगितले.वरळी,प्रभादेवी हा परीसर मुंबईतील कॉर्पोरेट हब आहे.त्यामुळे अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी,कंपन्यांचे प्रतिनिधी पालिका कार्यालयालाा भेट देऊन या यंत्रणांची पाहाणी करत असल्याचेही सांगण्यात आले .

  •  स्वयंचलित हात धुण्याचे मशिन
  •  स्वयंचलित सॅनिटायझर
  •  पेडल ऑपरेटेड सोप आणि सॅनिटायझर डिस्पेन्सर 
  •  शौचालयात स्वयंचलित सॅनिटायझर 
     

-------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

Sangola FDA Raid: सांगोल्यात एफडीएची मोठी कारवाई! ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध जप्त; १५ लाखांचा साठा जागेवरच नष्ट

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

SCROLL FOR NEXT