mobile robbery sakal media
मुंबई

चोरलेल्या मोबाईलचे लोकेशन परराज्यांत; रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाकडून शोध

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : रेल्वे प्रवासात (Railway journey) गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांच्या मोबाईलवर (Mobile robbery) डल्ला मारतात. चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांद्वारे विशेष पथक (Railway police) तयार केले आहे. सदर मोबाईलचा शोध घेतला असता बहुतांश मोबाईल उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमध्ये असल्याचे आढळून आले आहे. २०१८ ते २०२१ या कालावधीत चोरीला गेलेल्या चार हजारांहून अधिक मोबाईल ट्रेस (mobile tracing) करण्यात आले, ते मोबाईल परत मिळवण्यासाठी रेल्वे पोलिस प्रयत्न करत आहेत.

रेल्वे प्रवासात किंवा रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे मोबाईल लंपास होण्याच्या घटना घडतात. चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकाने २०१८ ते २०२१ दरम्यान चोरीला गेलेल्या चार हजार १०३ मोबाईल शोधून काढले. यापैकी ८२२ मोबाईल महाराष्ट्रात, तर उर्वरित तीन हजार २८१ मोबाईल परराज्यांत असल्याचे ट्रेस झाले. चोरीचे सर्वाधिक एक हजार १०२ मोबाईल हे उत्तर प्रदेशमध्ये ट्रेस झाले असून त्यापाठोपाठ बिहारमध्ये ४४२ आणि पश्चिम बंगालमध्ये ४४१, कर्नाटकात २४२, गुजरातमध्ये २०५ आणि आंध्र प्रदेशात १८९, मध्य प्रदेशात १५० आणि राजस्थानमध्ये १०८ चोरीचे मोबाईल सापडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

राज्यनिहाय ट्रेस झालेले मोबाईल
उत्तर प्रदेश - ११०२
बिहार - ४४२
पश्चिम बंगाल - ४४१
महाराष्ट्र - ४२४
मुंबई - ३९८
कर्नाटक - २४२
गुजरात - २०५
आंध्र प्रदेश - १८९
तामिळनाडू - १७८
मध्य प्रदेश - १५०
राजस्थान - १०८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT