Vajreshwari  sakall
मुंबई

Bhivandi Crime: वज्रेश्वरी गावाजवळ चोरांनी मारला डल्ला; देवाला लुटणारे चोर CCTV मध्ये कैद

देवालयातील दानपेट्या फोडून चोरट्यांची लूट; सीसीटीव्हीत कैद घटना | Loot of thieves by breaking donation boxes in temples; Incident caught on CCTV

दीपक हिरे, Chinmay Jagtap

कोयना प्रकल्प ग्रस्त नागरिकां साठी वसलेल्या भिवंडी तालुक्यातील म्हाळुंगे या ठिकाणी असलेल्या ग्रामदेवता गावडाई झोलाई देवीच्या मंदिरात 7 तारखेला पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मंदिरातील तीन दानपेट्या फोडून अंदाजे पन्नास हजार रुपयेच्या वर रक्कम चोरी केल्याची घटना घडली आहे.

भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी गावा नजिक कोयना प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी वसलेल्या म्हाळुंगे या गावात सर्व ग्रामस्थांनी मिळून ग्रामदेवता गावडाई झोलाई ग्रामदेवता देवीचे भव्य असे मंदीर काही वर्षांपूर्वी उभारले आहे.व या ठिकाणी मोठ्या भक्ती भावाने गावातील उत्सव, धार्मिक कार्यक्रम, पूजा अर्चा, रूढी परपरा नुसार सुरु असतात. नुकतेच या ठिकाणी काही महिन्या पूर्वी दोन क्रीडा महोत्सव, व धार्मिक कार्यक्रम चे आयोजन कोयना प्रकल्प ग्रस्त नागरिकां साठी ठेवण्यात आले होते, यावेळी परगावाहून मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी व भाविकांनी हजेरी लावली होती.

सदर ग्रामदैवत असलेल्या मंदिरातील दानपेटीत दान स्वरूपात पैसे टाकले होते, मात्र अद्याप पर्यंत गावडाई झोलाई देवालंय न्यास चे विश्वस्तानी दान पेट्या फोडल्या नव्हत्या. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुरेश मोरे यानी दिली.

आज सकाळी या मंदीराचे चे पुजारी नेहमी प्रमाणे पूजा अर्चा करण्यासाठी गेले असता कुणीतरी मंदिरातील दांनपेट्या फोडून इतत्र पडलेल्या दिसल्या व चोरी झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून तातडीने येथील सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

Roha ST Negligence: रोहा आगाराचा भोंगळ कारभार: मुसळधार पावसात बससाठी ताटकळलेल्या विद्यार्थिनी, पालकांचा संताप उसळला

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT