Eknath Shinde sakal
मुंबई

Mumbai Traffic : मुंबईची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी दुहेरी बोगद्यांचा विचार

मुख्यंमत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतला दुहेरी बोगद्यांचा प्रकल्प आढावा.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यात सुरू असलेले विविध पायाभूत सुविधांचे प्रकल्प, मेट्रो तसेच सिंचन प्रकल्पांना तातडीने गती देऊन कालबद्धरित्या हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच मुंबईतील वाहतूक कोंडीवरील उपाययोजनेसाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे दुहेरी बोगदा या नविन संकल्पनेचा वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व्हे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील वॉर रूममध्ये मंगळवार ता. २९ रोजी राज्यातील दहा महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे राज्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. ही कामे वेळेत सुरू झाल्यास त्याचा राज्यातील नागरिकांबरोबरच औद्योगिक विस्ताराला तसेच ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी मदत मिळणार आहे. त्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींची तातडीने पूर्तता करत प्रकल्पांना वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुणे मेट्रो, नागपूर मेट्रो, मुंबई मेट्रो, सिंचन प्रकल्प, समृद्धी महामार्गलगत इकॉनॉमिक झोन या प्रकल्पांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. मुंबई मेट्रो मार्गिका ४, ४ ए, आणि ११ साठी मोगरपाडा येथे डेपोसाठी जमीनसंपदाच्या विषयाबाबत आढावा घेण्यात आला.

मिठी नदी विकास व प्रदूषण नियंत्रण प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई महापालिका आयुक्तांना यावेळी देण्यात आल्या. ठाणे भिवंडी कल्याण या मुंबई मेट्रो पाचच्या मार्गिकेसाठी कशेळी येथील भूसंपादनाबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला.

यासोबतच, दक्षिण मुंबई परिसरातील महत्त्वाचे रस्ते, पदपथावर होणारे अतिक्रमण काढून रस्ते, चौक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले. समृद्धी महामार्गालगत इकॉनोमिक झोन करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. निम्न पैनगंगा प्रकल्प मार्गी लावण्याबाबत जलसंपदा विभागाला मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या.

मुंबईतील वाहतुक कोंडी होणाऱ्या ठिकाणी ग्रेड सेप्रेटर टाकून वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचे मुंबई महापालिकेला निर्देश देण्यात आले. वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरिता ट्विन टनेल या नविन संकल्पनेचा वापर करण्याबाबत मुंबई महापालिकेने सर्व्हे करावा याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्ग कनेक्ट करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT