Mumbai  sakal
मुंबई

Mumbai : दिवाळीपूर्वी मुंबईत घातपाताची धमकी..

पोलिसांच्या हेल्पलाइनवर धमकीचा फोन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिवाळीपूर्वी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांना आल्याची माहिती उघडकीस आली आहे. मुंबईतील अंधेरी आणि जुहूसह तीन ठिकाणी फोनवर बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. हा फोन पोलिस हेल्पलाइन क्रमांक 112 वर आला होता.

या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहू येथील पीव्हीआर मॉल आणि सहारा हॉटेल विमानतळावर बॉम्बस्फोट होणार आहेत. हा कॉल कोणी केला याचा शोध अद्याप पोलिसांना लागलेला नाही. मात्र या फोननंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. आझाद मैदान पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात कलम 505 (1)(B), 170, 182 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

फोनवरून धमकी

मुंबई पोलिसांच्या 112 क्रमांकाच्या हेल्पलाइनवर कॉल आला. की, बुधवारी रात्री 10.30 वाजता हा कॉल आला होता. पोलिसांना हा फोन कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. मुंबई पोलीस फोन करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. या फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. कॉलवर नमूद केलेल्या ठिकाणांनुसार पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी तपास सुरू केला आहे. आतापर्यंत पोलिसांना त्या ठिकाणी कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडलेली नाही.

धमक्यांचे सत्र

वास्तविक, अलीकडच्या काळात मुंबई पोलिसांना असे अनेक धमकीचे फोन येत आहेत. तपासात असल्याचे पोलिसांच्या तपासात अफवा किंवा खोडसाळ वृत्तीने केल्याचे निष्पन्न झाल्याचे दिसले आहे. साधारण महिनाभरापूर्वी सांताक्रूझ येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला असेच धमकीचे फोन आले होते, त्यात बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती. मात्र, ही धमकी पूर्णपणे खोटी ठरली होती आणि आरोपीला बिहारमधून पोलिसांनी अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

Piyush Goyal : पावभाजीची चव रोबोट देऊ शकणार नाही; वैभव सूर्यवंशीसारखा सिक्सरही नाही! कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादा आणि भारतातील संशोधनाच्या संधींवर पियुष गोयल यांची मांडणी

Latest Marathi News Live Update : तर आम्ही आणखी मोठा बॉम्ब फोडणार! मनोज जरांगे पाटील आक्रमक

आधी सौंदर्यस्पर्धांवर बंदी, आता मृत्युदंडाची शिक्षा! बुर्किना फासोच्या निर्णयांची का आहे जगभरात चर्चा?

SCROLL FOR NEXT