मुंबई

Mumbai Crime News : मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला धमकीचा मेल, एफआयआर दाखल

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला धमकीचा मेल आला आहे

रोहित कणसे

मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाला धमकीचा मेल आला आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, या धमकीच्या मेलमध्ये अमेरिकन कॉन्सुलेट जनरलचे कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासाच्या कार्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्याप्रकरणी वांद्रे कुर्ला पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

यूएस कॉन्सुलेटमध्ये धमकीचा मेल मिळाल्यानंतर, मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ५०५(१)(बी) आणि ५०६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बीकेसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ३.५० वाजता rkgtrading777@gamil.com वरून हा धमकीचा मेल आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतः अमेरिकन नागरिकांना मारण्याचे प्लॅनिंग असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Aadhaar Card Update: 'आधार कार्ड'मधून खरंच नाव आणि पत्ता गायब होणार? सत्य काय आहे? सरकारचं अधिकृत स्पष्टीकरण समोर

SCROLL FOR NEXT