मुंबई

तलासरी येथे तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार? जखमी अवस्थेतील मुलीचा वैद्यकीय अहवाल प्रतिक्षेत

प्रविण चव्हाण

तलासरी ः तालुक्‍यातील पाटीलपाडा येथील तीन वर्षीय चिमुरडीला शुक्रवारी (ता.1) रात्री पळवून नेण्यात आले होते. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेतला असता ती जखमी अवस्थेत रडताना आढळून आली. या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाला असण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. मुलीला डहाणू येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी झाली असून तिच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार तलासरी शहरातील पाटीलपाडा येथील आदिवासी पीडित चिमुरडी व तिचे कुटुंबीय राहते. शुक्रवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास घरात आईसोबत ही चिमुकली झोपलेली असताना तिला अज्ञात आरोपीने उचलून नेले. मुलीला घेऊन पळ काढलेल्या अज्ञात आरोपीचा व मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न आई-वडिलांनी केला असता काही अंतरावरील शेतात मुलगी सापडली. त्यात ती पीडित चिमुरडी गंभीर जखमी असल्याने उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
याप्रकरणी तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपींचा कसून शोध घेण्यासाठी डॉग स्कॉडला पाचारण करून पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. 

- विशेष पथकाची नियुक्ती 
या प्रकरणाची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी धनाजी नलावडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिस निरीक्षक अजय वसावे यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली. या घटनेनंतर तलासरी परिसरात संतापाचे वातावरण आहे. जनवादी महिला संघटनेने आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर पीडितेच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्यासाठी समुपदेशन होणे गरजेचे आहे. शासनाच्या मनोधैर्य योजनेतून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तत्काळ मदत करण्याची मागणीदेखील केली जात आहे. 

Three year old girl abused in Talasari? Awaiting medical report of injured girl

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT