Tushar Gandhi  Sakal
मुंबई

Tushar Gandhi : संविधान बदलण्याची तयारी सुरू तुषार गांधी यांनी व्यक्त केली चिंता

लोकशाही धोक्यात आली आहे याबद्दल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी चिंता व्यक्त केली.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - या देशातील सामान्य माणसाला गुलाम केले आहेच. आता संविधान बदलण्याचे काम सुरू आहे. लोकशाही धोक्यात आली आहे याबद्दल महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी चिंता व्यक्त केली. मतदारांनी गांभीर्याने विचार करावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे. "आम्ही भारतीय" या संघटनेने महाविकास आङाडीला पाठिंबा दिला आहे.

आझाद मैदान येथील मुंबई मराठी पत्रकार संघ येथे अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी " आम्ही भारतीय " या संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत तुषार गांधी बोलत होते. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, साहित्यिक अर्जून डांगळे, रिपाई नेते शाम दादा गायकवाड, फिरोज मिठीबोरवाला, इरफान इंजिनिअर, डोल्फी डिसुझा, शरद कदम आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर यांनी लिहलेल्या संविधानाची मोडतोड करण्याचे काम २०१४ पासून सुरू झाले तर २०१९ पासून हे भारतीय संविधान उ‌द्ध्वस्त करण्याच्या कामाला वेग आलेला आहे. राक्षसी बहुमत त्यासाठी त्यांना हवे आहे. भाजपाचे काही नेते उघडपणे संविधान बदलण्याची भाषा बोलत आहेत, असे तुषार गांधी म्हणाले.

लोकशाहीच्या रक्षणासाठी बनविण्यात आलेल्या अधिकतर संस्था कमजोर केल्या जात आहेत म्हणून २०२४ ची निवडणूक ही संविधान आणि लोकशाही तसेच लोकशाही मधील अधिकार वाचवण्याची निवडणूक आहे. या देशात लोकशाही राहणार की हुकूमशाही राजवट येणार याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे, असे जेय्ष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्टा सटेलवाड म्हणाल्या.

धर्माधता, जातीयता आणि प्रांतवादावर या निवडणूकीत भर दिला जात आहे. मुंबईत मराठी माणसाने नोकरी साठी अर्ज करू नये अशी जाहिरात असेल किंवा आमच्या सोसायटीत मराठी माणसाने घर घेऊ नये किंवा प्रचाराला येऊ नये असा भाषिकवाद जोपासला जात आहे.असे शामदादा गायकवाड म्हणाले.

आघाडीला पाठिंबा जाहिर

पेत्या 20 तारखेला मुंबईत आणि राज्यातीत काही ठिकाणी निवडणूक आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन आम्ही भारतीय च्या वतीने करण्यात आले आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : महागाईचा झटका ! एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; जाणून घ्या घरगुती आणि व्यावसायिक LPG चे ताजे दर

Singapore Open Win: आधी सलग ४ वेळा अपयश, पण सिंगापूर ओपनमध्ये भारतीय वाघांची थेट पहिल्या स्थानावर मुसंडी!

Ujani Temple: उजनीतील प्राचीन स्थापत्यकलेचा वारसा पुन्हा उजेडात; पाणी साठा घटल्याने पळसनाथ मंदिराचे दर्शन, पाच दशकांनंतरही सुस्थितीत

Maharashtra Weather: राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस, मेघगर्जना आणि गारपिटीचा इशारा; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यात गावठी दारुच्या ५४ हातभट्ट्या, ४ वर्षांत दोन लाख लिटर दारु, ३० लाख रसायन लिटर नष्ट; गावागावांत हातभट्टीचा महापूर, वाचा...

SCROLL FOR NEXT