to prevent water pollution ban on tankers 12 july 2023 thane chemical water sakal
मुंबई

Mumbai News : ठाणे जिल्ह्यातील नदी प्रदूषण रोखण्यासाठी टँकरला बंदी

12 जुलै पर्यंत रात्रीच्या वेळेस एमआयडीसी परिसरातील टँकर वाहतुकीस बंदी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाणे जिल्ह्यातील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. एमआयडीसी मधील कारखान्यांतून रासायनिक सांडपाणी हे प्रक्रिया न करता अनेकदा तसेच सोडले जाते. त्यातच रात्रीच्या वेळेस नाले, खाडी, नदी पात्रात टँकर मधून रासायनिक सांडपाणी आणून ते टँकर रिते केले जात असल्याची बाब उघड झाली आहे.

हे नदी प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली ,अंबरनाथ, बदलापूर एमआयडीसी परिसरात रात्रीच्या वेळेस सर्व प्रकारच्या टँकरला बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी अद्यापही कायम ठेवण्यात आली आहे. 12 जुलै पर्यंत ही बंदी कायम करण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ व बदलापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होवून लोकांच्या आरोग्यास धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होतो.

या वर आळा घालण्यासाठी ठाणे शहर विशेष शाखेचे पोलीस व वाहतूक पोलिसां कडून औद्योगिक क्षेत्रामध्ये सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला रात्रीच्या वेळेस बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी अजून ही कायम ठेवण्यात आली आहे.

14 मे पासून 12 जुलैपर्यंत संध्याकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंतच्या कालावधीत सर्व प्रकारच्या टँकर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये टँकरच्या माध्यमातून धोकादायक केमिकल नदीच्या पात्रात सोडले जाते.

यामुळे नदी पत्रातील पाणी प्रदूषित होऊन लोकांच्या आरोग्या धोका व नदीतील जैवविविधतेवर परिणाम होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ठाणे शहर विशेष शाखेकडून सांगण्यात आले आहे.

औद्योगिक क्षेत्रात रात्रीच्या वेळेस टँकर वाहतुकीला बंदी आधीच घालण्यात आली आहे. त्या मनाई आदेशाची मुदत वाढ करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

मंदार धर्माधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग कल्याण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री शहरातील मोकळ्या जागा, क्रीडांगणे आणि मनोरंजनासाठीची मैदाने आमदारांना आणि बिल्डर मित्रांच्या हवाली करत आहेत - आदित्य ठाकरे

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

Mumbai News: सी लिंकला 'तारीख पे तारीख'! 'वांद्रे-वर्सोवा'साठी चार टप्प्यांत १,४२१ दिवसांची मुदतवाढ

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

SCROLL FOR NEXT