मुंबई

पिस्तुलांची विक्री करण्यास आलेल्या आरोपीला अटक

CD
पिस्तुलांची विक्री करण्यास आलेल्या आरोपीला अटक सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ४ : लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी चार देशी पिस्तुल आणि काही जिवंत काडतुसांसह एका व्यक्तीला अटक केली आहे. पायधुनी परिसरातील स. का. पाटील उद्यानाजवळ आरोपी पिस्तुल विकण्यासाठी आला होता. प्रदीप वासनिक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. स. का. पाटील उद्यान परिसरात एक व्यक्ती काही पिस्तुल विकण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अरुण जाधव यांना त्यांच्या सुत्रांकडून मिळाली होती. त्यावरून पायधुनी पोलिस स्टेशन आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्टेशन यांनी संयुक्तरीत्या सापळा रचून आरोपी परिसरात येताच त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडून पाच देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आणि १० जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. या सर्व मुद्देमालाची किंमत जवळपास १ लाख २६ हजार रुपये आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Purchase Limit India : मोदी सरकारचा मोठा निर्णय ! डिझेल विक्रीवर मर्यादा; एका व्यक्तीला मिळणार फक्त 'इतके' डिझेल

घरच्यांचा विरोध झुगारून केलं प्रेमविवाह! पद्मिनी कोल्हापूरेचा भन्नाट लव्हस्टोरी

Latest Marathi News Live Update : बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकडमध्ये छ. शिवरायांच्या पुतळ्यावरून पुन्हा वादाची ठिणगी

Interview : "हा निव्वळ योगायोग" गव्हर्नर सिनेमावर दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर व्यक्त; "मनोज बाजपेयींमुळे ही संधी मिळाली "

Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची धावपळ; १५ जुलैपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कसरत, अपूर्ण कामांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

SCROLL FOR NEXT