मुंबई

साकीनाका परिसरात तरुणीची निर्घृण हत्या

CD
साकीनाका परिसरात तरुणीची हत्या प्रियकराला पोलिसांकडून अटक मुंबई, ता. ६ ः मुंबईच्या साकीनाका परिसरात २९ वर्षांच्या तरुणीची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मनीषा जाधव असे तिचे नाव आहे. मनीषाचा प्रियकर राजू निळे (४२) यानेच तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्याला अटक केली आहे. मनीषा आणि राजू तीन वर्षे साकीनाका परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मनीषा घरकाम करत होती. राजू टीव्ही दुरुस्तीचे काम करत होता. त्याचे आधीही एक लग्न झालेले होते. तो जेव्हा आपल्या पहिल्या बायकोला भेटायला जायचा तेव्हा मनीषाचे त्याच्याशी भांडण व्हायचे. नेहमीप्रमाणेच राजू त्याच्या पत्नीला भेटायला गेला होता. त्याचा राग आल्याने मनीषा आणि त्याच्यात पुन्हा जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात राजूने खलबत्ता मनीषाच्या डोक्यात मारला. चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. पोलिसांना मनीषा जखमी अवस्थेत आढळली. तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी राजूवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update : मान्सूनचा विमानसेवेवर परिणाम; सोलापूर-गोवा आणि सोलापूर-हैदराबाद उड्डाणे ऑगस्टपर्यंत स्थगित

Pimpri: लग्न जमविण्याच्या नावाखाली घातला जातोय गंडा; विवाहेच्छूंनो सावधान; बनावट प्रोफाइलद्वारे फसवणुकीचे वाढते प्रकार

Obesity Crisis in Maharashtra: महाराष्ट्रात स्थूलतेचा झपाट्याने वाढता धोका; १० पैकी ४ महिला जादा वजनाच्या, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा इशारा

Pune: पाच हजार नागरिकांचे घराचे स्वप्न प्रतीक्षेत; दहा हजारांपेक्षा जास्त अर्ज; घरांची संख्या मर्यादितच

SCROLL FOR NEXT