मुंबई

किहीम येथील रस्त्यासाठी साकडे

CD
किहीम येथील रस्त्यांसाठी पालकमंत्र्यांना साकडे अलिबाग, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या किहीम येथील सुमारे १३ किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्याचा परिणाम पर्यटनावर होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांना साकडे घातले. जिल्हा वार्षिक योजना कार्यक्रमांतर्गत २५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी किहीम ग्रामपंचायतीचे सदस्य प्रसाद गायकवाड, नरेश म्हात्रे, रश्मी राऊत तसेच ग्रामस्थ उमेश दातार, अक्षय वाघे, अविनाश दातार, अनंत वाघे, निलेश पवार आदी उपस्थित होते. किहीममध्ये आठवडा अखेर आणि अन्य सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते. समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातात. पर्यटकांमुळे येथील स्थानिक व्यवसायिकांना रोजगार प्राप्त होतो; परंतु गावांतील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांची सुधारणा करणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी मंगळवारी अदिती तटकरे यांची भेट घेऊन येथील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, ODI: ८ षटकार अन् ८ फोर... भारताविरुद्ध गुरबाजचं शतक, डिविलियर्सचा विक्रमही मोडला; पण विदर्भाच्या पठ्ठ्याही चमकला

Aadhaar Card Rule: मोठी बातमी! १८ वर्षांवरील लोकांना आधार कार्ड मिळणार नाही; असा निर्णय नेमका कुणी घेतला अन् का? नवे नियम लागू

Latest Marathi News Live Update : जळगावचा विचार करता, हा विजय एकतर्फी असेल - गुलाबराव पाटील

IND vs AFG, ODI: पाऊस सुरू असताना भारताचे खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये नक्की काय करत होते? BCCI नेच शेअर केलाय Video

Pune Traffic: विश्रांतवाडी चौक ते फुले नगर रस्त्यावरचा बीआरटीमार्ग काढून टाकण्याचा निर्णय; पीएमपीचा विरोध मनपाने झुगारला

SCROLL FOR NEXT