मुंबई

भिवंडीत टेम्पोच्या धडकेत बालकाचा मृत्यू

CD
भिवंडीत टेम्पोच्या धडकेत बालकाचा मृत्यू भिवंडी, ता. २० (बातमीदार) : रस्ता ओलांडत असताना टेम्पोने दिलेल्या धडकेत सायकलस्वार बालकाचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील कोनगावात घडली आहे. इसाक गफार शेख (१३, रा. ड्रिम कॉम्प्लेक्स, कोनगाव) असे या बालकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत टेम्पोचालक धनराज चव्हाण याला अटक केली असून, तो मद्यपान करून गाडी चालवत असल्याचे उघड झाले आहे. इसाक हा सायकलने कोनगांव येथील यामाहा शोरूम समोरील रस्ता ओलांडत होता. त्यावेळी कल्याणहून भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोने (एमएच ०४ एफपी ७१८४) इसाकच्या सायकलीला धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. स्थानिकांनी चालकास पकडून कोनगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal NH48 Bridge : कागलकरांचं स्वप्न होणार पूर्ण! 295 कोटींचा 50 पिलरचा भव्य उड्डाणपूल; देशातील सर्वात सुंदर पूल साकारणार, मंत्री मुश्रीफ यांची पायाभरणीवेळी ग्वाही

Koyna Dam Water Storage 100 TMC : 'कृष्णा'काठी जलसंकट टळले! 'कोयने'त 100, तर 'चांदोली'त 34 टीएमसी साठा; शेतीसाठी पुरेसे पाणी

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

SCROLL FOR NEXT