मुंबई

व्यापार नुकसानीत गेल्या महिन्याच्या तुलनेत घट

CD

नवी दिल्ली, ता. १५ ः आयात - निर्यातीत घट झाल्यामुळे देशाच्या व्यापारातील नुकसानीमध्ये डिसेंबर २०२१ च्या तुलनेत जानेवारी २०२२ मध्ये घट झाली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये व्यापार २१.६८ अरब डॉलर होता, तो जानेवारी २०२२ मध्ये १७.४२ अरब डॉलर झाला आहे. यात १९.६४ टक्क्यांची घट झाली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने यासंबंधीची आकडेवारी जारी केली आहे.

जानेवारीमध्ये निर्यातीत दरवर्षीच्या तुलनेत २५.३ टक्के वाढ झाली आहे. पण, डिसेंबरच्या तुलनेत यात ८.७ टक्क्यांची घट झाली आहे; तर आयातीत दर वर्षीच्या तुलनेत २३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे; पण डिसेंबरच्या तुलनेत यात १२.८ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे आयात ५१.९ अरब डॉलर; तर निर्यात ३४.५ अरब डॉलर झाली आहे.

नॉन-पेट्रोलियम आणि नॉन-जेम्स व ज्लेलरी निर्यातीत २०.१ टक्क्यांची वाढ होऊन ते २७.१ अरब डॉलर झाले आहे; तर त्यांच्या आयातीत ३१.३ टक्क्यांची वाढ होऊन ते ३४.६ अरब डॉलर एवढे झाले आहे. दुसऱ्या बाजूला जानेवारी २०२२ मध्ये व्यापारी निर्यातीत २५.२८ टक्क्यांची वाढ होऊन ते ३४.५ अरब डॉलर झाले; तर आयातीत २३.५४ टक्क्यांची वाढ होऊन ते ५१.९३ अरब डॉलर झाले.
---
आयात केलेल्या प्रमुख वस्तू
पेट्रोलियम, इलेक्ट्रॉनिक सामान, सोने, कोयला, कोक, ऑर्गेनिक आणि अनऑर्गेनिक रसायने इत्यादी
---
निर्यात केलेल्या वस्तू
इंजिनिअरिंग सामान, पेट्रोलियम पदार्थ, जेम्स आणि ज्वेलरी, औषधी इत्यादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझमध्ये अमेरिकेचा जहाजावर हल्ला, २४ पैकी ३ भारतीयांचा मृत्यू; २१ जणांना काढलं बाहेर

Railway News: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २१ दिवस मेगा ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द, नेमके कसे असतील मार्ग?

Panchganga River Incident : ‘दिनक्रमच’ ठरला, काळाचा घाला; वर्षानुवर्षे पोहणाऱ्या कृष्णात मामांना पाण्यानेच कस गिळलं, पंचगंगा नदीवरील घटनेनं सर्वंच अचंबीत

ठाण्याला ऑडिशन साताऱ्याला शूटिंग, 'कृष्णाईच्या लेकी'मध्ये दिसतेय कोकणातील अभिनेत्री; म्हणते- सुरुवातीला खूप टेन्शन

Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी तयारी! पेशवेकालीन कुशावर्त तीर्थातील तुटलेल्या पायऱ्या-दगड बदलणार, 18 कोटींचा प्रकल्प नेमका आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT