मुंबई

सिद्धार्थ कॉलनी येथील भुयारी मार्गाची दुरवस्था

CD

चेंबूर, ता. १० (बातमीदार) ः घाटकोपर-सायन मार्गावरील सिद्धार्थ कॉलनी येथील एमएमआरडीएने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. एमएमआरडीएने या भुयारी मार्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी नेस्ट संस्थेच्या सचिव स्वाती तपासे व विशाल गायकवाड यांनी केली आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, घाटकोपर-सायन मार्गावर सतत अपघात होत असल्याने ते टाळण्याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा भुयारी मार्ग बनवला. २०१ लाख रुपये खर्च करून ऑक्टोबर २००१ मध्ये काम पूर्ण केले. तेव्हापासून या भुयारी मार्गाचा वापर या परिसरातील नागरिक करीत आहेत. सध्या या भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. मार्गावरील दिवे बंद आहेत. पायऱ्यांवरील लाद्या उखडल्या आहे. वॉचमन नाही. एक दरवाजा गंजलेला आहे, त्याला लाकडाचा आधार देण्यात आला आहे. पावसाळा जवळ आला आहे. पावसाळ्यात स्लॅबमधून पाणी गळते. गटारातील घाणीचे पाणी भुयारी मार्गात शिरते. रात्री सर्वत्र अंधार असतो. त्यामुळे त्वरित दुरुस्ती करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: सर्वोत्तम खेळाडूचा 'गोल्डन बूट' कोणाला? मेस्सी, रोनाल्डोसह हे खेळाडू प्रमुख दावेदार

Cancer Drug Price Hike: कॅन्सर उपचार होणार महाग! जीवनावश्यक औषधांच्या किमती 50% पर्यंत वाढण्याची शक्यता; केंद्र सरकारची मंजुरी

घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्टीच्या वादावर पडदा, रंगाच्या पट्ट्या मारत काढला तोडगा

Vidarbha Schools: विदर्भात 30 जूनला वाजणार शाळांची घंटा; न्यायालयाचे आदेश, शासनाचे सुधारित पत्र निघणार

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याखाली

SCROLL FOR NEXT