मुंबई

कुपोषित मुलांची आरोग्य तपासणी

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आणि दी लाईफ फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुक्यातील कुपोषित मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे मंगळवारी आयोजन केले होते. शिबिरामध्ये अलिबागमधील बालरोग तज्‍ज्ञ डॉ. राजेंद्र चांदोरकर आणि डॉ. विनायक पाटील यांनी बालकांची तपासणी केली. दी लाईफ फाऊंडेशनतर्फे मुलांना कल्शियम सिरप, आयरन सिरप तसेच डी व्हिटॅमिन औषधे देण्यात आली. तसेच मेडले फार्मा लिमिटेड येथून अन्सार सोलकर यांनी, बालकांची हिमोग्लोबिन तपासणी करून त्यांना आर बी टोन ड्रॉप दिले. कुपोषित मुलांना पूरक आहार म्हणून दररोज एक उकडलेले अंडे देण्याची व्यवस्था दी लाईफ फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे. शिबिरात अलिबाग तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील, सामिया पेरेकर, दीप्ती मोकल यांनी उपस्थित होत्‍या. शिबिर यशस्वी होण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे, राखी राणे व प्रणय ओव्हाळ यांनी मेहनत घेतली.

अलिबाग : अलिबाग तालुक्यातील कुपोषित मुलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तपासणी करताना बालरोग तज्ञ व उपस्थित मान्यवर,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT