मुंबई

पाच लाख बालकांना जंतनाशक गोळ्या

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १४ : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यातील एक वर्ष ते १९ वर्षे वयोगटातील ५ लाख १५ हजार मुलामुलींना मंगळवारी (ता.१३) जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत अलिबाग शहरातील नमिता नाईक इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून करण्यात आला.
जंतनाशक मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले होते. ग्रामीण भागात ५४ प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच २८० आरोग्य उपकेंद्रांवर कार्यरत वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी सहभाग नोंदविला, तर शहरी भागात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फतही मोहीम राबवण्यात आली. १ ते १९ वर्षे वयोगटातील मुलांना अंगणवाड्या, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये येथे जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या. ज्या मुलांना मंगळवारी जंतनाशक गोळी मिळाली नाही, त्यांना २० फेब्रुवारी रोजी मॉप-अप राऊंडच्या वेळी गोळी देण्यात येणार आहे. जंतनाशक मोहीम शुभारंभ कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे, बालसंगोपन अधिकारी डॉ. प्रताप शिंदे उपस्थित होते.

बालके ही देशाचे भविष्य आहेत. ते निरोगी असणे गरजेचे आहे. वैयक्तिक स्वच्छता राखण्यासोबत सर्वांनी परिसरही स्वच्छ ठेवावा. यामुळे जंतूंचा विस्तार होण्यास प्रतिबंध बसेल. जंत दोषामुळे बालकांमध्ये ॲनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो शिवाय आतड्यांना सूज येणे, पोटदुखी, भूक मंदावणे, उलट्या, अतिसार तसेच इतर आजार उद्भवतात. या आजारांना आळा घालण्यासाठी वर्षातून दोन वेळा बालकांनी जंतनाशक गोळी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. भरत बास्टेवाड,
मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

Mangalwedha News : मंगळवेढा तालुक्यात 4777 कुटुंबाचे धान्य ऐन दुष्काळात बंद

Manchar Water Issue : आंबेगाव तालुक्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर तातडीने नियोजन करा; प्रांताधिकारी अर्चना तांबे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

SCROLL FOR NEXT