मुंबई

फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया

CD

फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया
रायगडात १४७ प्रजातींचा मुक्त संचार; अधिवास संवर्धनाची गरज
पाली, ता. १६ (वार्ताहर) : पश्चिम घाटाचा विस्तीर्ण पट्टा, मुबलक वनसंपदा, निसर्गरम्य समुद्रकिनारे आणि कांदळवनांमुळे रायगड जिल्ह्यात फुलपाखरांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात तब्बल १४७ प्रजातींच्या फुलपाखरांचा मुक्त संचार पाहायला मिळत असून, त्यात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन (राणी पाकोळी) आणि पश्चिम घाटातील सर्वांत मोठे दुर्मिळ सदर्न बर्ड विंग यांचाही समावेश आहे.
फुलपाखरांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या वनस्पती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. कडुनिंब, कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, लिंबू, कदंब आणि अशोक यांसारख्या झाडांवर फुलपाखरे अंडी घालतात. सोनटक्का व पानफुटी या वनस्पतींवर ग्रास डीमन आणि रेड पियरो यांसारख्या प्रजातींची वाढ होते. या रंगीबेरंगी सृष्टीने पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही भुरळ घातली आहे. तिनविरा धरणाजवळ खासगी फुलपाखरू उद्यानही उभारण्यात आले आहे. परसबागेत फुलपाखरे आकर्षित करण्यासाठी आवश्यक वनस्पतींना नागरिकांकडून मागणी वाढत असल्याचे ग्रीन टच नर्सरीचे मालक अमित निंबाळकर यांनी सांगितले.
जगात फुलपाखरांच्या सुमारे १७ हजार ५००, भारतात १ हजार ५००, तर महाराष्ट्रात ३४५ प्रजाती आढळतात. त्यापैकी १४७ प्रजाती रायगडात आहेत. गुलाबी राणी, पितांबरी, सांजपरी, हळदीकुंकू, नील भिरभिरी, मयूर भिरभिरी आणि शुष्क पर्ण या त्यांतील वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहेत, अशी माहिती अभ्यासक प्रवीण कवळे यांनी दिली.
मात्र, तणनाशकांचा वाढता वापर, तापमानवाढ, औद्योगिकीकरण आणि प्रदूषणामुळे फुलपाखरांच्या अळ्या व सुरवंटांचा अधिवास धोक्यात येत आहे. घराच्या अंगणात पपई, पेरूसारखी फळे किंवा सडका बांगडा मासा ठेवूनही काही फुलपाखरांना आकर्षित करता येते, असे अभ्यासक शंतनू कुवेस्कर यांनी सांगितले. फुलपाखरे परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने जैवविविधता टिकवण्यासाठी जंगल आणि कांदळवनांतील त्यांच्या अधिवासाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT