मुंबई

पालिका रुग्‍णालयांतील बालकांच्या जन्मतारखेच सखोल तपासणी

CD

पालिका रुग्‍णालयांतील बालकांच्या जन्मतारखेची सखोल तपासणी
बनावट दाखल्‍याप्रकरणी महापालिकेची कारवाई सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : महापालिकेने मोठा निर्णय घेत २०१५ पासून आतापर्यंत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या सर्व मुलांच्या जन्मदाखल्याची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेशी नागरिकांच्या मुलांना बनावट जन्मदाखला देण्यात आल्याची शंका व्यक्त होत असून, याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या एम-पूर्व विभागातील गोवंडी शताब्दी रुग्णालयात तब्बल २०० मुलांची बनावट जन्मनोंद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात महापालिकेने आपल्या एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यासह दोन लिपिकांना तत्काळ निलंबित केले आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केला होता की, गोवंडी परिसरातील शताब्दी रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने २०० मुलांची बनावट जन्मनोंद तयार करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्राथमिक चौकशीत हे आरोप बरोबर असल्याचे निष्पन्न झाले.
महापालिकेच्या नियमानुसार, रुग्णालयात जन्मलेल्या मुलाचा जन्मदाखला एका वर्षाच्या आत तयार करणे बंधनकारक आहे. एका वर्षापेक्षा मोठ्या वयाच्या मुलांसाठी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेश आवश्यक असतो, मात्र गोवंडीतील प्रकरणात नोंद झालेली ही मुले प्रत्यक्षात असल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत. म्हणजेच रुग्णालयातून बोगस जन्म दाखवून बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आली होती.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणात सखोल चौकशी सुरू केली असून, संबंधित अधिकारी आणि लिपिकांविरुद्ध गंभीर प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकारानंतर महापालिकेच्या रुग्णालयांतील जन्मनोंदणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बांगलादेशी, रोहिंग्यांची संभाव्य घुसखोरी उघड होणार
या घटनेनंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी २०१५ पासून आजपर्यंत महापालिकेच्या सर्व रुग्णालयांतून जारी करण्यात आलेल्या जन्मप्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या तपासणीमुळे केवळ बनावट प्रमाणपत्रच नाही, तर मुंबईत बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांची संभाव्य घुसखोरी उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenakshi Natarajan Nomination Rejected : काँग्रेसला मोठा धक्का! राज्यसभेच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज रद्द; भाजपच्या तक्रारीनंतर ऐनवेळी नेमकं काय घडलं?

IND A vs SL A : ऋतुराज गायकवाडचे 'रौद्र रूप' पाहून सारेच चक्रावले; वादग्रस्त निकालावर भडकला, अम्पायरला भिडला, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Update : नागपुरात 1.49 कोटींच्या मुद्देमालासह 150 किलो गांजा जप्त

Sangli Rainfall Record Scam : पावसाच्या आकड्यांमध्ये हेराफेरी करून 15 कोटींचे नुकसान? माजी खासदाराच्या 'त्या' आरोपाने कृषी विभागात खळबळ, 'स्कायमेट'ला धाडली नोटीस

TCS Company Case : निदा खानच्या कुटुंबीयांची चौकशी; संशयितांना मदतप्रकरणी ‘बडा नेता’ही चौकशीच्या रडारवर

SCROLL FOR NEXT