सीडीओई प्रवेश प्रक्रियेस
विशेष अंतिम मुदतवाढ
मुंबई, ता. ११ : मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस १३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विशेष अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी किमान पात्रताधारकांना थेट प्रवेशाची संधी दिली जात आहे.
दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्रामार्फत चालविण्यात येत असलेल्या एमएमएस (मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज) आणि एमसीए (मास्टर ऑफ काॅम्प्युटर ॲप्लिकेशन) या दोन वर्षीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शुल्क अदा करण्यासाठी सीडीओईमार्फत ऑनलाइन पेमेंट लिंक पाठवली जात आहे. सीडीओई केंद्रात मागील शैक्षणिक वर्षापासून एमए समाजशास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आला आहे. या शैक्षणिक वर्षापासून डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (डीएसएम) हा अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ते परीक्षा ही सर्व प्रकिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील या सर्व अभ्यासक्रमांची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळावरून करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंबधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://cdoe.uom.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.