मुंबई

तिकीटचोरांना रेल्वेचा दणका!

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : विनातिकीट आणि अवैध तिकिटावर प्रवास करणाऱ्यांविरोधात मध्य रेल्वेने एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांत विशेष मोहीम राबवून २०.४७ लाख प्रवाशांवर कारवाई केली. या कारवाईतून १५९.३४ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षी याच कालावधीत ११६.४६ कोटी रुपयांचा दंड वसूल झाला होता. यंदा दंडवसुलीत सुमारे ३६.८ टक्के वाढ झाली आहे.

तिकीट तपासणी पथकांनी मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर आणि उपनगरी रेल्वे सेवांमध्ये ही मोहीम राबवली. विनातिकीट प्रवासासाठी किमान दंडाची रक्कम २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली आहे. त्याचबरोबर नियमित आणि अचानक तपासणीवर भर दिला जात आहे.

मुंबई विभागातून सर्वाधिक वसुली
विभागनिहाय आकडेवारीनुसार, मुंबई विभागातून सर्वाधिक ६६.९२ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या विभागात १०.११ लाख प्रकरणांची नोंद झाली. भुसावळ विभागात ३.७७ लाख प्रकरणांतून ३८.९० कोटी रुपये, पुणे विभागात २.१३ लाख प्रकरणांतून १८.६८ कोटी रुपये, तर नागपूर विभागात २.३६ लाख प्रकरणांतून १७.९३ कोटी रुपये वसूल झाले.

सप्टेंबरमध्ये १८.५३ कोटींचा दंड
सप्टेंबर २०२६ या एका महिन्यात २.४४ लाख प्रवाशांवर कारवाई करून १८.५३ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांत दररोज सरासरी ११,१८४ प्रवाशांवर कारवाई झाली. त्यातून दररोज ८७ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.

फोर्ट्रेस तपासणीसह विशेष मोहीम
स्थानकांवरील नियमित तपासणी, अचानक तपासणी, फोर्ट्रेस तपासणी, सखोल तपासणी आणि विशेष मेगा तपासणी मोहिमांद्वारे ही कारवाई केली जात आहे. फोर्ट्रेस तपासणीमध्ये स्थानकावरील प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर नियंत्रण ठेवून प्रवाशांची तिकीट तपासणी केली जाते. या मोहिमा मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष गाड्या तसेच मुंबई आणि पुणे विभागांतील उपनगरी सेवांमध्ये राबविण्यात येत आहेत.

ग्राफिक्स

सहा महिन्यांतील कारवाई

- एकूण प्रवाशांवर कारवाई : २०.४७ लाख
- एकूण दंडवसुली : १५९.३४ कोटी रुपये
- मागील वर्षीची दंडवसुली : ११६.४६ कोटी रुपये
- दंडवसुलीतील वाढ : सुमारे ३६.८ टक्के
- सप्टेंबरमधील दंडवसुली : १८.५३ कोटी रुपये
- दररोजची सरासरी दंडवसुली : ८७ लाख रुपयांहून अधिक

विभागनिहाय दंडवसुली

- मुंबई : ६६.९२ कोटी रुपये
- भुसावळ : ३८.९० कोटी रुपये
- पुणे : १८.६८ कोटी रुपये
- नागपूर : १७.९३ कोटी रुपये
- सोलापूर : ७.२७ कोटी रुपये
- मुख्यालय : ९.६३ कोटी रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight Cancellation: इंडिगोचा मोठा निर्णय! 'त्या' देशाकडे जाणारी उड्डाणे १७ ऑक्टोबरपर्यंत रद्द

SACHIN YUVRAJ: सचिन तेंडुलकर, युवराज सिंग अन् झहीर खानला संघातून का डच्चू दिला? माजी मुख्य निवडकर्त्याने सांगितलं खरं कारण!

Latest Marathi News Live Update: यूपीआयवरील चार्जेस दिवाळीनंतर लागू होणार

नकळत जयच्या मनातील प्रेम ओठांवर येणार! शरूसमोर देणार प्रेमाची कबुली? SANAI CHAUGHADE मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

Gandhinagar: अमित शाहांच्या मतदारसंघात काय घडलं? गांधीनगर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने किती जागा जिंकल्या?

SCROLL FOR NEXT