मुंबई

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मध्य रेल्वेच्या २४ विशेष गाड्या

CD

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी २४ विशेष गाड्या
मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिकसह विविध मार्गांवर सेवा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला जाणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे २४ विशेष रेल्वे चालविणार आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड, अकोला आणि भुसावळ या मार्गांवर १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान आरक्षित आणि अनारक्षित विशेष गाड्या धावणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून गाडी क्रमांक ०१२१९ ही १८ ऑक्टोबरला, तर ०१०१९ ही १९ आणि २१ ऑक्टोबरला दुपारी २.३० वाजता सुटेल. दोन्ही गाड्या दुसऱ्या दिवशी सकाळी ६.१० वाजता नागपूरला पोहोचतील. परतीसाठी गाडी क्रमांक ०१२२० ही १९ ऑक्टोबरला, तर ०१०२० ही २० आणि २२ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजता नागपूरहून सुटेल. या गाड्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचतील.

पुणे, सोलापूरसह अन्य मार्गांवर सेवा
पुणे-नागपूर विशेष गाडी १९ आणि २१ ऑक्टोबरला, तर परतीची गाडी २० आणि २२ ऑक्टोबरला धावेल. सोलापूरहून नागपूरसाठी १९ ऑक्टोबरला आणि परतीसाठी २० ऑक्टोबरला विशेष गाडी चालविण्यात येईल. नागपूर-अकोला मार्गावर २० आणि २१ ऑक्टोबरला, तर परतीच्या दिशेने २१ आणि २२ ऑक्टोबरला गाड्या धावतील. नागपूर-भुसावळ मार्गावरही याच तारखांना विशेष सेवा उपलब्ध असेल. याशिवाय नाशिक रोड-नागपूर मेमू विशेष गाड्या १८ आणि २० ऑक्टोबरला, तर परतीच्या गाड्या १९ आणि २१ ऑक्टोबरला चालविण्यात येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; अप-डाउन मार्गावरील लोकल रखडल्या, गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल

Vani Crime : एका लाखाच्या बदल्यात सहा लाखांचे आमिष दाखवून पेस्ट कंट्रोल व्यावसायिकाला लुटले...; तिघांना अटक

IPL 2027 मध्ये रोहित शर्मा पुन्हा मुंबईचा कर्णधार? हार्दिक पंड्याचं काय होणार?

China Woman Story: एअर होस्टेसची नोकरी सोडली! आता खेकडे विकून 'ती' करते दिवसाला १४ लाखांची कमाई

BJP Victory: अमित शाह बोलले! राहुल गांधींना दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, 2029च्या निवडणुकांमध्ये...

SCROLL FOR NEXT