मुंबई

रत्नागिरीत राज्यातील पहिले रेल्वे शीतगृह

CD

रत्नागिरीत राज्यातील पहिले रेल्वे शीतगृह
आंबा, मासळीसाठी कोकण रेल्वेचा पुढाकार

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : हापूस आंबा, मासळी, द्राक्षे आणि डाळिंबासारख्या नाशवंत उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोकण रेल्वेने शीतसाखळी विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी येथे दोन हजार टन क्षमतेचे शीतगृह उभारण्यात येणार असून, त्यासाठी कोकण रेल्वे आणि सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
या प्रकल्पासाठी जागा कोकण रेल्वे उपलब्ध करून देणार असून, उभारणीसाठीची गुंतवणूक महामंडळ करणार आहे. महसूल वाटपाच्या तत्त्वावर उभारण्यात येणारे हे शीतगृह दीड वर्षात सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली. वाशी येथील सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्रात गुरुवारी (ता. १५) कोकण रेल्वेचा ३७ वा स्थापना दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात झा यांनी शीतसाखळी सुविधांसह महामंडळाच्या मालवाहतुकीसंदर्भातील योजनांची माहिती दिली.
...
साठवणुकीची सुविधा
प्रस्तावित शीतगृहात उणे २१ आणि ४ अंश सेल्सिअस तापमानाचे स्वतंत्र कक्ष असतील. त्यामध्ये मासळी, गोठवलेले मांस, आंब्याचा गर, दूध, बटर आणि फळे साठवता येतील. कोल्हापूर, सातारा आणि सांगली भागांतून येणाऱ्या डाळिंब, कांदे आणि द्राक्षांसाठीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. कोकण रेल्वेच्या मालवाहतूक केंद्रावर अशा प्रकारचे शीतगृह उभारण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगण्यात आले.
...
जागा रेल्वेची, गुंतवणूक महामंडळाची
रत्नागिरी येथील रेल्वे मालवाहतूक केंद्रावर हे शीतगृह उभारले जाणार आहे. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देणार असून, सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन उभारणीचा खर्च करणार आहे.
...
शीतसाखळीचे नियोजन
रत्नागिरीव्यतिरिक्त खेड, चिपळूण, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, मुरूडेश्वर आणि मानकी येथेही शीतसाखळी सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. या सुविधांमुळे स्थानिक कृषी उत्पादनांची साठवणूक करून ती मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविणे अधिक सोयीचे होऊ शकते. विशेषतः नाशवंत मालाची गुणवत्ता टिकविण्यासाठी आणि वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी या सुविधा उपयुक्त ठरणार आहेत.
...
कंटेनर सायडिंग, गोदामांचाही विस्तार
रत्नागिरी येथे कंटेनर सायडिंग विकसित करण्यात येणार आहे. तसेच वेर्णा, इंदापूर आणि रत्नागिरी येथे धान्य साठवणुकीसाठी ‘सायलो’ उभारण्याचे नियोजन आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि झाराप येथे गोदामे विकसित केली जाणार आहेत. या पायाभूत सुविधांमुळे मालाची साठवणूक, हाताळणी आणि रेल्वेमार्गे वाहतुकीसाठी पर्याय वाढणार आहेत.
...
कोकणातील हापूस आंबा, मासळी आणि अन्य कृषी उत्पादनांना मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी शीतसाखळी सुविधांचा विस्तार करणार आहोत. रत्नागिरीतील शीतगृहासह आणखी सात ठिकाणी सुविधा विकसित करून नाशवंत मालाची साठवणूक आणि रेल्वेमार्गे वाहतूक अधिक सुलभ करण्यावर भर आहे.
- संतोष कुमार झा, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, कोकण रेल्वे
...
शीतगृहाची वैशिष्ट्ये
- क्षमता : दोन हजार टन
- तापमान : उणे २१ आणि ४ अंश सेल्सिअस
- जागा : कोकण रेल्वे उपलब्ध करून देणार
- गुंतवणूक : सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन
- प्रकल्पाचे स्वरूप : महसूल वाटप
- उभारणीचे नियोजन : दीड वर्ष
- साठवणूक : मासळी, गोठवलेले मांस, आंब्याचा गर, दूध, बटर आणि फळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT