मुंबई

अकरा वर्षांत १,००० हून अधिक रुग्णांवर मणक्याची शस्त्रक्रिया

CD

अकरा वर्षांत १,००० हून अधिक रुग्णांवर मणक्याची शस्त्रक्रिया
जेजे-जीटी रुग्णालयाची उल्लेखनीय कामगिरी; अनेकांना मिळाले नवे आयुष्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : जेजे-जीटी रुग्णालयात गेल्या ११ वर्षांत मणक्याच्या विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या १,००० हून अधिक रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रियांमुळे अनेक रुग्णांना पुन्हा चालता-फिरता येऊ लागले असून, त्यांना सामान्य जीवन जगण्यास मदत झाली आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण दीर्घकाळ मोबाईलवर मान झुकवून पाहतात, तासन्तास एकाच स्थितीत बसून काम करतात किंवा चुकीच्या पद्धतीने जड वजन उचलतात. या सवयींचा मणक्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. विशेषतः नोकरदारवर्ग, वाहनचालक आणि बराच वेळ मान किंवा पाठ झुकवून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये कंबरदुखी व मानेच्या दुखण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. मणक्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जेजे-जीटी रुग्णालयातील मणक्याच्या शस्त्रक्रियांमुळे अनेक गंभीर रुग्णांना नव्याने जीवन जगण्याची संधी मिळाली आहे.
रुग्णालयातील मणक्याचे तज्ज्ञ डॉ. धीरज सोनावणे यांच्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे ५० टक्के रुग्ण मणक्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असतात. योग्य निदान आणि वेळेवर उपचार केल्यास अनेक रुग्णांच्या हालचालींमध्ये सुधारणा होऊ शकते आणि त्यांना दैनंदिन कामे पुन्हा करता येऊ शकतात.

स्कोलिओसिसच्या रुग्णांनाही उपचारांचा फायदा
मणक्याच्या आजारांमध्ये स्कोलिओसिस या विकाराचाही समावेश होतो. या आजारात मणका असामान्य पद्धतीने वाकतो. त्यामुळे शरीराच्या ठेवणीत बदल होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये चालणे-फिरणे तसेच श्वास घेण्यासही त्रास होण्याची शक्यता असते. जे. जे. रुग्णालयात अशा रुग्णांवरही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. योग्य उपचारांमुळे काही रुग्णांना हालचाल करणे आणि दैनंदिन जीवनातील कामे पार पाडणे अधिक सुलभ झाले आहे.

अपघात, उंचीवरून पडणे आणि संसर्गामुळेही मणक्याला धोका
रस्ते अपघात, उंचीवरून पडणे, खेळताना होणाऱ्या दुखापती, हाडांची कमजोरी आणि काही संसर्ग यांमुळेही मणक्याला इजा होऊ शकते. त्यामुळे मणक्याच्या आरोग्यासाठी केवळ जीवनशैलीतील सवयीच नव्हे, तर अपघातांपासून बचाव आणि योग्य वेळी उपचार घेणेही महत्त्वाचे आहे.

मणक्याचे आरोग्य जपण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला
मणक्याचे आजार टाळण्यासाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे आवश्यक आहे. दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे टाळणे, मोबाईल वापरताना मान सतत खाली झुकवून न ठेवणे, योग्य पद्धतीने वजन उचलणे, नियमित शारीरिक हालचाल करणे आणि कामाच्या ठिकाणी योग्य बैठक ठेवणे यामुळे मणक्यावरील अनावश्यक ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT