एलआयसीच्या तीन नव्या विमा योजना
कर्करोग, आरोग्य संरक्षणासह निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्नाची सुविधा
मुंबई, ता. १६ : भारतीय आयुर्विमा मंडळांनी कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी आरोग्यविषयक दोन योजना तसेच निवृत्तीनंतरच्या निश्चित उत्पन्नासाठी एक योजना आणली आहे.
महामंडळाचे सीईओ आणि एमडी आर. दोराईस्वामी यांनी नुकतेच या तीन योजनांचे अनावरण केले. या योजना १९ ऑक्टोबरपासून खरेदी करता येतील. जीवनधारा २ (प्लॅन ८९२ मध्ये) हप्ते भरण्याचा कालावधी संपल्यानंतर निश्चित परतावा मिळेल, पॉलिसीधारकांच्या गरजानुसार वेगवेगळ्या प्रकारे परतावा मिळेल, पॉलिसीच्या कालावधीत ज्यादा प्रीमियम देऊन जादा परतावा मिळण्याचीही व्यवस्था आहे. एक रकमी किंवा नियमित हप्ते भरण्याचीदेखील सोय यात आहे. १८ वर्षांपासून ही पॉलिसी घेता येईल. हेल्थ शील्ड (प्लॅन ९०७) योजनेत संपूर्ण कुटुंबाला सर्वंकष आरोग्य कवच मिळते, यात रुग्णालयात दाखल झाल्यास रोजचा परतावा मिळतो आणि मोठ्या शस्त्रक्रिया आणि गंभीर आजार यासाठी एकरकमी परतावा मिळतो, मुख्य पॉलिसीधारकाला १८ ते ६५ वयापर्यंत ही पॉलिसी घेता येते. ९० दिवस ते २० वर्षे वय असलेल्या मुलांना अन्य विमाधारक म्हणून पात्रता मिळते. अतिरिक्त प्रीमियम भरल्यास अन्य फायदेदेखील मिळू शकतात, यात नो क्लेम बेनिफिटदेखील आहे.
वयानुसार विमा कवच
कॅन्सर कव्हर (प्लॅन क्रमांक ९०८) योजनेमध्ये, विशिष्ट प्रकारचा कर्करोग लवकरच्या टप्प्यात उघड झाल्यास निश्चित रकमेच्या २५ टक्के रक्कम मिळते, तर विशिष्ट कर्करोग पुढच्या टप्प्यात असल्याचे उघड झाल्यास १०० टक्के रक्कम मिळते. १८ ते ६५ वयात ही पॉलिसी घेता येईल. किमान १० वर्षे पॉलिसीचे हप्ते भरावे लागतील. वयानुसार १५ लाख ते ३५ लाखांपर्यंतचे विमा कवच यात मिळू शकते. या योजनेतील सर्व पॉलिसींचा विचार करता ५० लाखांपर्यंत विमा कवच मिळू शकते, अधिक माहिती www.licindia.in. या संकेतस्थळावर मिळेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.