मुंबई

ऐतिहासिक पवई तलावाचे पाणी होणार पिण्यायोग्य

CD

ऐतिहासिक पवई तलावाचे पाणी होणार पिण्यायोग्य
​महापालिकेचा मेगा प्लॅन; गाळ काढणार, जलशुद्धीकरण केंद्र उभारणार
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : कमी पाऊस आणि एल निनोच्या प्रभावामुळे भविष्यात उद्‍भवणाऱ्या पाण्याच्या संकटावर मात करण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे. मुंबईकरांच्या पाणीटंचाईच्या समूळ उच्चाटनासाठी महापालिकेने ऐतिहासिक पवई तलावावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. या तलावाचे पाणी पिण्यायोग्य बनवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी लवकरच सल्लागार नियुक्त केला जाणार असून, गाळ उपसल्यानंतर येथे एक अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
​ऐतिहासिक पवई तलाव हा महापालिकेचा अत्यंत महत्त्वाचा जलस्रोतांपैकी एक आहे. तब्बल २१० हेक्टर (सुमारे ५५७ एकर) परिसरात पसरलेल्या या तलावाचा परीघ १०.२ किलोमीटर असून, यात अब्जावधी लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. मात्र, अनेक वर्षांत या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, माती, जलपर्णी आणि सांडपाणी साचल्यामुळे त्याची मूळ साठवण क्षमता कमालीची घटली आहे. परिणामी सध्या हे पाणी पिणे तर दूरच, साध्या वापरासाठीही योग्य राहिले नाही. आता हा ऐतिहासिक ठेवा आणि महत्त्वाचा जलस्रोत वाचवण्यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलली असून, यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी येणार आहे. नुकत्याच पूर्ण झालेल्या गाळ सर्वेक्षण अहवालानुसार, पवई जलाशयाची एकूण साठवण क्षमता ५.४५५ दशलक्ष घनमीटर्सवरून घसरून ३.६९३ दशलक्ष घनमीटर्सवर आली आहे. म्हणजेच तलावाची पाणी साठवण क्षमता ३२.३० टक्क्यांनी कमी झाली आहे.
पवई तलावाची पाणी साठवण क्षमता अंदाजे ५,४५५ दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र, पाणी पिण्यायोग्य नसल्यामुळे सध्या या पाण्याचा वापर केवळ व्यावसायिक कारणांसाठी होतो. यात आरे मिल्क डेअरीसाठी बागकाम आणि जनावरांच्या वापरासाठी तसेच एल अँड टी कंपनीला औद्योगिक वापरासाठी अशा एकूण १०.३ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाण्याचा पुरवठा केला जातो.
पुनरुज्जीवनासाठी कामे वेगात सुरू
पवई तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महापालिकेने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. सध्या दोन आधुनिक हार्वेस्टर यंत्रांच्या मदतीने तलावातील जलपर्णी वेगाने काढण्यात येत आहे. तलावातील गाळ काढण्याबाबतची व्यवहार्यता तपासण्यासाठी मेसर्स ग्रीन यात्रा या स्वयंसेवी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. तलावातील परिसंस्था आणि जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीची मदत घेतली जाणार आहे.
​तलावातील गाळ काढून तो पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर येथे एक अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाईल. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून यावर लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाणार आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

FDA Action : मुदतबाह्य, खराब अन्नपदार्थांच्या साठ्याची विल्हेवाट संशयास्पद; रिलायन्स रिटेल, ब्लिंकिटला ‘एफडीए’चा दणका

IND vs WI 5th T20I: पाऊस थांबला, ९ वाजता टॉस, सव्वा नऊ वाजता मॅच सुरू होणार; वाचा किती षटकांचा सामना रंगणार

Beed News : बीडमध्ये महायुतीच्या सभेत भाजपच्या दोन आमदारांची दांडी; पंकजाताईंच्या टोमण्याने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT