मुंबई

महावितरणसाठी गडहिंग्लज विभाग ''स्मार्ट''

CD

महावितरणसाठी गडहिंग्लज विभाग ‘स्मार्ट’
एक लाख ५५ हजार घरगुती मीटर; अंमलबजावणीत राज्यात प्रथम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : राज्यभरात महावितरणच्या स्मार्ट मीटरला विरोध होत असला तरी गडहिंग्लज विभाग महावितरणसाठी स्मार्ट ठरला आहे. येथे असलेल्या सर्व एक लाख ५५ हजार १८९ ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर बसवले आहेत. स्मार्ट मीटरचे फायदे पटल्याने या विभागात १०० टक्के स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. या कामगिरीमुळे गडहिंग्लज विभाग राज्यात प्रथम ठरला आहे. जनजागृती, ग्राहकांच्या शंकांचे निरसन आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांतून हे शक्य झाले आहे.
गडहिंग्लज विभागात ऑगस्ट २०२४ मध्ये पहिला स्मार्ट मीटर बसवून मोहिमेला सुरुवात झाली होती. गडहिंग्लज, आजरा, चंदगड आणि नेसरी या चार उपविभागांत टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात आले. चंदगडमध्ये ४८,३८६, गडहिंग्लजमध्ये ४२,३४०, आजऱ्यामध्ये ३७,१६९ तर नेसरीमध्ये २७,२९४ मीटर बसवण्यात आले आहेत. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी समाधान व्यक्त केले आहे. लवकरच गडहिंग्लज जिल्ह्यातील आणखी दोन विभागांत १०० टक्के स्मार्ट मीटरचे काम पूर्ण होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्य, फायदे सांगितल्याने यश
प्रत्येक गावात सीरिजमध्ये मीटर बसवण्यात आले. अभियंते, कर्मचारी आणि जनमित्रांनी ग्राहकांना स्मार्ट मीटरचे कार्य आणि फायदे समजावून सांगितले. मेळावे, जनजागृती कार्यक्रम आणि ग्रामसभांच्या माध्यमातून थेट संवाद साधून गैरसमज दूर करण्यात आल्याचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर, घटनेनं खळबळ

Latest Marathi News Live Update : टायगर श्रॉफ यांच्यावरील गोळीबारानंतर वर्षा गायकवाड यांची राज्य सरकावर टीका

Yavatmal News: सोयाबीनने ओलांडला साडेसहा हजारांचा टप्पा; अत्यल्प पावसामुळे घटले उत्पादन, बाजारात आवक कमी

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

वयाच्या ८८ व्या वर्षीही मर्दानी खेळांचा थरार! शांताबाई पवार यांची प्रेरणादायी कहाणी |Shantabai Pawar

SCROLL FOR NEXT